मिहानमध्ये रेल्वेने लवकरच येणार कॉन्कोरचे कंटेनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:55 PM2018-05-17T23:55:09+5:302018-05-17T23:55:31+5:30

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीनुसार नागपूर लॉजिस्टिक हब म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे मिहानमध्ये कॉन्कोरचा इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) बनविण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच कॉन्कोरचे कंटेनर रेल्वेने येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कंटेनर महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. कल्याणा रामा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

Connor's container in MIHAN will arrive soon | मिहानमध्ये रेल्वेने लवकरच येणार कॉन्कोरचे कंटेनर

मिहानमध्ये रेल्वेने लवकरच येणार कॉन्कोरचे कंटेनर

Next
ठळक मुद्देव्ही. कल्याणा रामा : २०२० पर्यंत १०० आयसीडी, २० वितरण केंद्र सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीनुसार नागपूर लॉजिस्टिक हब म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे मिहानमध्ये कॉन्कोरचा इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) बनविण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच कॉन्कोरचे कंटेनर रेल्वेने येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कंटेनर महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. कल्याणा रामा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी निर्यातक, आयातदार आणि अन्य आयसीडी यूजर्सकरिता आयोजित बैठकीत हजर राहण्यासाठी रामा नागपुरात आले असता त्यांनी गुरुवारी नागपुरातील कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या अजनी येथील मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
रामा म्हणाले, सध्या रस्ते मार्गाने कंटेनर आणण्यात येत आहेत. येथे वेअर हाऊसिंग सुविधा आहे. यावर्षी १७ जानेवारीला रायपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर एक कंटेनर रॅक (रेल्वे) पाठविण्यात आली. सध्या खापरी रेल्वे परिसरात काम सुरू असल्यामुळे नियमितरीत्या कंटेनर रॅक चालविणे शक्य नाही. हे काम सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. लवकरच ट्रेनने कॉन्कोरचे कंटेनर येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कॉन्कोरची ६,५०० कोटींची उलाढाल
रामा म्हणाले, कॉन्कोर सार्वजनिक क्षेत्रातील एक नवरत्न कंपनी आहे. गत आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल ६,५०० कोटींची होती. कॉन्कोरचे देशात ७९ आयसीडी (डेपो) आहेत. नागपुरात अजनी येथे आयसीडीची स्थापना १९९७ मध्ये झाली, तर नवीन आयसीडी मिहानमध्ये बनविण्यात आला आहे. यावर्षी संपूर्ण देशात एक नवीन आयसीडी सुरू होणार आहे. २०२० पर्यंत १०० आयसीडी आणि २० थर्ड पार्टी (२० पीएल) लॉजिस्टिक डिस्ट्रिब्युशन सेंटर स्थापन करण्याचे लक्ष्य आहे. सेंटरच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या, औद्योगिक उत्पादन व कच्च्या मालाचे वितरण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत एक सेंटर नागपूरच्या आसपास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंटेनर व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी आयातीत घट झाल्यामुळे व्यवसाय कमी झाला आहे. पण यावर्षी व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात दर आठवड्यात दोन रॅकला मंजुरी
व्ही. कल्याणा रामा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत बांगलादेशात नागपुरातून एक कंटेनर पाठविण्यात आला आहे. त्यानंतर बांगलादेश सरकारने आठवड्यात दोन रॅक पाठविण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात भारत सरकारकडून काही प्रक्रिया प्रलंबित आहेत. मंजुरी मिळताच बांगलादेशात दर आठवड्यात नागपुरातून कोलकाता आयसीडीमार्फत दोन रॅक पाठविण्यात येणार आहे.
मोबाईल अ‍ॅप सांगणार कंटेनरचे लोकेशन
कॉन्कोरने मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या कंटेनरच्या लोकेशनची माहिती मिळणार आहे. यामुळे कॉन्कोरच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येऊन ग्राहकांची सुविधा झाली आहे. त्यांना कोणत्याही वेळी ‘कन्टिन्युअस कार्गो व्हिजिबिलिटी’चा फायदा घेता येईल.
पत्रपरिषदेत कॉन्कोरचे संचालक (इंटरनॅशनल मार्केटिंग व आॅपरेशन) संजय स्वरूप, कार्यकारी संचालक वासुदेव राव आणि मुख्य महाव्यवस्थापक (नागपूर क्षेत्र) अनुप सत्पथी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Connor's container in MIHAN will arrive soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.