रेल्वे क्लब, हॉल आणि शाळांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:33+5:302021-04-26T04:07:33+5:30
नागपूर : शहरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना संक्रमणावरील प्रतिबंधासाठी रेल्वेने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. या अंतर्गत ऑक्सिजन एक्सप्रेसमधून नागपुरात ...
नागपूर : शहरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना संक्रमणावरील प्रतिबंधासाठी रेल्वेने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. या अंतर्गत ऑक्सिजन एक्सप्रेसमधून नागपुरात ४५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे टँकर उतरविण्यात आले होते. आता रेल्वेने क्लब, हॉल, शाळा आणि अन्य इमारतींमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
अजनी रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वेच्या मालकीच्या अनेक इमारती, भूखंड आहेत. या ठिकाणी हे सेंटर उभारले जाऊ शकते. रेल्वेच्या कोचमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्याच्या चर्चा अलीकडे वेग धरत असला तरी रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, यातून संक्रमण वाढण्याचा धोका अधिक असून, हे खर्चाचे काम आहे. मध्ये रेल्वेतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, नागपूर स्टेशनच्या हाेमलँड प्लॅटफाॅर्म किंवा अजनी स्टेशनच्या प्लॅटफाॅर्मवर हे सेंटर उभारण्याचा आधी विचार केला होता. मात्र, नंतर तो विचार बदलला. या दोन्ही स्थानकांवर प्रवासी रेल्वेतून येतात. हवेमुळे संक्रमण पसरून संसर्ग वाढू शकतो. यामुळे हे रहित केले. कोचमध्ये सेंटर तयार केल्यास मोठ्या प्रमाणावर कूलर तसेच अन्य साधनांवर खर्च करावा लागणार आहे.
...
अजनी आयसीडीसुद्धा उपयुक्त
एक रेल्वे अधिकारी म्हणाले, कंटेनर काॅपाेर्रेशन ऑफ इंडियाच्या अजनीमधील इनलँड कंटेनर डेपाेच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारणे अधिक उपयुक्त होईल. तिथे कुणीच बाहेरील व्यक्ती येत नाही. यामुळे संक्रमणाचा धोका टळेल तसेच रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात मदत मिळेल. याशिवाय अजनी रेल्वे काॅलनीमध्ये रिकाम्या असलेल्या इमारती आणि डीआरएम ऑफिस परिसरातील गुंजन सभागृहाच्या इमारतीतही काेविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे.
....