सरपंच ताजने यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:10 AM2021-09-07T04:10:24+5:302021-09-07T04:10:24+5:30

भिवापूर : पदाचा दुरुपयोग करून देवस्थानच्या जागेवर समाजभवनाचे बांधकाम केले, असा आरोप करीत सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत दाखल ...

Consolation to Sarpanch Tajne | सरपंच ताजने यांना दिलासा

सरपंच ताजने यांना दिलासा

Next

भिवापूर : पदाचा दुरुपयोग करून देवस्थानच्या जागेवर समाजभवनाचे बांधकाम केले, असा आरोप करीत सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत दाखल केलेली याचिका अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी फेटाळली आहे. त्यामुळे धापर्ला (डोये) ग्रामपंचायतीचे सरपंच पवन ताजने यांना दिलासा मिळाला आहे.

धापर्ला (डोये) ग्रामपंचायतीच्या वतीने गावात समाजभवन बांधण्यात आले. सदर समाजभवन हे विठ्ठल मंदिर देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आले असून, यासाठी सरपंच पवन ताजने यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे, असा आरोप करीत ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक उमक यांनी केला असून, ताजने यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांनी सादर केलेले कागदपत्र, पुराव्याचे व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन करून, ३ ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केले. या आदेशात त्यांनी सरपंच पवन ताजने यांना निर्दोष असल्याचे स्पष्ट करीत, अशोक उमक यांची याचिका फेटाळून लावली. समाजभवन बांधकामावरून धापर्ला (डोये) या गावात मागील कित्येक दिवसापासून वाद विकोपाला गेला होता. त्यातून वारंवार राजकीय गटबाजीसुद्धा उफाळून येत होती. मात्र याचिकेवरील निर्णयामुळे वातावरण काहीसे शमले आहे.

060921\img-20210906-wa0110.jpg

ग्रामपंचायत धापर्ला (डोये)

Web Title: Consolation to Sarpanch Tajne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.