नागपुरातील आंबेडकर रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:39 AM2018-10-28T01:39:34+5:302018-10-28T01:41:09+5:30
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र तर नाही ना, अशी शंका उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र तर नाही ना, अशी शंका उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिपत्याखाली हे रुग्णालय येते. २००६ मध्ये २५० खाटांचे हे रुग्णालय होणार होते. २०१४ मध्ये या रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची घोषणाही करण्यात आली, परंतु रुग्णालयाचा विकासच झाला नाही. आवश्यक मनुष्यबळ, औषधे व इतरही सोयी नसल्याने हे रुग्णालय गेल्या १२ वर्षांपासून बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. या रुग्णालयाच्या विकासाला घेऊन शासन उदासीन असल्याचा आरोप उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाने केला आहे. शनिवारी यासंदर्भातील निवेदन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिले जाणार होते. परंतु हे निवेदन त्यांच्या नावे अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना देण्यात आले. शिष्टमंडळात नगरसेवक संदीप सहारे, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक त्रिशरण सहारे, रमण पैगवार, पंकज लोणारे, विवेक निकोसे, राज खत्री, जयंत जांभुळकर, बादल वाहणे, प्रशांत उके, रंजितसिंह मटारू, प्रवीण सहारे, सुनील सोमकुंवरआदींचा सहभाग होता.