२६ जानेवारीला कन्याकुमारीवरून निघालेला संविधान रथ गुरूवारी दीक्षाभूमीवर!

By गणेश हुड | Published: March 13, 2024 08:08 PM2024-03-13T20:08:40+5:302024-03-13T20:09:15+5:30

संविधान जागृती रथ गुरुवारी सायंकाळी ५ वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर येणार

Constitution Chariot left from Kanyakumari on 26th January on initiation on Thursday! | २६ जानेवारीला कन्याकुमारीवरून निघालेला संविधान रथ गुरूवारी दीक्षाभूमीवर!

२६ जानेवारीला कन्याकुमारीवरून निघालेला संविधान रथ गुरूवारी दीक्षाभूमीवर!

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: २६ जानेवारीला कन्याकुमारी वरून दिल्लीकडे निघालेला संविधान जागृती रथ गुरुवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत आहे. या रथाच्या स्वागतासाठी नागपूरच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संविधान प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नागपुरातील संविधान जागृती रथयात्रेचे आयोजक उत्तम शेवडे यांनी केले आहे.

१५ मार्चला संविधान रथ यात्रा दुपारी १२ वाजता संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाशी राणी चौकातील कांशीरामजी जयंती निमित्त मधुरम सभागृहात आयोजित सभेत कांशीरामजींना अभिवादन केल्यावर मध्य प्रदेशातील शिवनी कडे रवाना होईल.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना अंतिम संदेश देताना "प्रगतीचा हा रथ मी मोठ्या कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे, शक्य असेल तर पुढे न्यावा, शक्य नसल्यास तिथे सोडावा, परंतु याला कदापिही मागे जाऊ देऊ नका" असा संदेश दिला होता. 

त्यांचा तो संदेश घेऊन दिल्लीतील अखिल भारतीय आंबेडकर संविधान जागृती ट्रस्ट ने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २६ जानेवारी या गणराज्य दिनापासून संविधान जागृती रथ यात्रेची सुरुवात केली.

Web Title: Constitution Chariot left from Kanyakumari on 26th January on initiation on Thursday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर