न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संविधान सन्मान यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:28 AM2018-09-23T00:28:54+5:302018-09-23T00:31:50+5:30
देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसातील प्रस्थापना. या आधारेच देशात शांततामय लोकशाही निर्माण करण्यासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी ३०० वर संघटनांचा सहभाग असलेल्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे दांडी ते दिल्ली अशी देशव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती विलास भोंगाडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसातील प्रस्थापना. या आधारेच देशात शांततामय लोकशाही निर्माण करण्यासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी ३०० वर संघटनांचा सहभाग असलेल्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे दांडी ते दिल्ली अशी देशव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती विलास भोंगाडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
दांडी गुजरात येथून २ आॅक्टोबर रोजी या यात्रेला सुरुवात होईल. देशभरात ही यात्रा फिरेल. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे याचा समारोप होईल. १२ आॅक्टोबर रोजी ही संविधान सन्मान यात्रा छत्तीसगड येथून नागपुरात दाखल होईल. संविधान चौकात या यात्रेचे स्वागत केले जाईल. दुपरी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी वर्धा रोड येथे संविधान सन्मान परिषद होईल. या परिषदेला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रफुल्ल सामंतारा, सुनिती, सुभाष लोमटे, डॉ. सुनील यांच्यासह ई.झेड. खोब्रागडे, डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, डॉ. रुपा कुळकर्णी डॉ. सतीश गोगुलवार, जगजितसिंग अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
पत्रपरिषदेत डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. कृष्णा कांबळे, पी.एस. खोब्रागडे, जयंत इंगळे, गुरुप्रितसिंग, प्रसेनजित गायकवाड, नरेश वाहाणे, सलीम शरीफ, आरीफ बेलीम, प्रकाश तोवर आदी उपस्थित होते.