संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:58 AM2019-03-07T00:58:54+5:302019-03-07T01:01:25+5:30

नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.

Constitutional preamble inscriptions of work Bhumi Pujan | संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमिपूजन

संविधान चौकातील संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमीपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ.डॉ. मिलींद माने, संदीप जाधव व उपस्थित मान्यवर

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ लाखांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.
याप्रसंगी आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ.डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अमर बागडे, किशोर जिचकार, जितेंद्र घोडेस्वार, राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे सचिव शिवदास वासे, धर्मेश फुसाटे, संविधान फाऊंडेशनचे प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, बबली मेश्राम उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. शिलालेखासाठी संदीप जाधव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. मनपाने संविधान उद्देशिका शिलालेखासाठी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. शिलालेखाची उंची सुमारे १८ ते २० फू ट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील. संविधाच्या प्रतिकृतीवर राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ असल्याची माहिती जाधव यांनी दिली. संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी तर आभार सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी मानले.

 

Web Title: Constitutional preamble inscriptions of work Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.