जिल्ह्यात एक हजार तलाव बांधणार- पालकमंत्री बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 12:04 PM2017-08-16T12:04:18+5:302017-08-16T12:06:13+5:30
जिल्ह्यात एक हजार गाव तलाव बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
नागपूर, दि. 16 : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या उपक्रमात धर्मापुरी येथे माजी मालगुजारी तलावांची सिंचन क्षमता वाढली असून तलावातील उपलब्ध पाण्यामुळे शेती पिकातील पिकांना जीवदान मिळत आहे. प्रत्येक गावात शाश्वत सिंचनासाठी गाव तेथे तलाव हा उपक्रम राबवून जिल्ह्यात एक हजार गाव तलाव बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मौदा तालुक्यातील धर्मापुरी या गाव शिवारात असलेल्या माजी मालगुजारी तलावात जलपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या श्रीमती अध्यक्षा निशाताई सावरकर, सदानंद निमकर, उप जिल्हाधिकारी मनीषा जायभाय, कृषी विभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती हटवार, पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, सरपंच श्री. मदनकर तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.