२० मीटरपर्यंत बांधकामास मनाई
By admin | Published: June 21, 2015 02:58 AM2015-06-21T02:58:59+5:302015-06-21T02:58:59+5:30
नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. पण रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत बांधकाम करण्यास मनाई
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. पण रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत बांधकाम करण्यास मनाई करणारा आदेश नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.ने (एनएमआरसीएल) शनिवारी काढला. मनाई आदेशाची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येणार आहे.
मेट्रो रेल्वेचे बहुतांश बांधकाम पिलर उभारून रस्त्यांच्या मध्य भागातून तर सीताबर्डी आणि लगतच्या परिसरात मुख्य रस्त्याच्या एका बाजूला करण्यात येणार आहे. आदेशानुसार या परिसरात मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत जनतेला आणि व्यापाऱ्यांना विकास कामे आणि नवीन बांधकाम करता येणार नाही किंवा जुने बांधकामही पाडता येणार नाही. या आदेशानंतर मेट्रो रेल्वेचे बांधकाम अत्यंत सहजतेने होईल, असा कंपनीचा दावा आहे.
या प्रकल्पामुळे नागपूरची वाहतूक अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक होणार असल्याचे कंपनीचे मत आहे. मेट्रो रेल्वेची पूर्व-पश्चिम लांबी १८.५५७ कि़मी. आणि उत्तर-दक्षिण लांबी १९.६५८ कि़मी. असून या दोन्ही मार्गावर एकूण ३६ स्थानके राहतील. (प्रतिनिधी)