मेट्रो रेल्वेसाठी गर्डर बॉक्सची निर्मिती

By admin | Published: May 25, 2016 02:52 AM2016-05-25T02:52:20+5:302016-05-25T02:52:20+5:30

मेट्रो रेल्वे पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे.

Construction of girder box for Metro rail | मेट्रो रेल्वेसाठी गर्डर बॉक्सची निर्मिती

मेट्रो रेल्वेसाठी गर्डर बॉक्सची निर्मिती

Next

२२ एकरमध्ये प्रकल्प : वेळेची बचत होणार
नागपूर : मेट्रो रेल्वे पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. दोन पिलरमध्ये पूर्वीच तयार झालेले गर्डर क्रेनच्या साह्याने बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेच्या बचतीसह नवीन तंत्रज्ञानाने पुलाचे काम अधिक मजबूत आणि वेगाने होणार आहे.
दरदिवशी चार गर्डरची निर्मिती
प्रकल्पात गेल्या आठवड्यात बॉक्स गर्डरची निर्मिती सुरू झाली. सध्या चार ते पाच गर्डर तयार झाले आहेत. या कामाला वेग येऊन दरदिवशी चार गर्डर तयार होणार आहे. पुलासाठी एकूण २,३९० गर्डरची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पात गर्डरसाठी दोन क्रेनसह चार बेड तयार केले आहेत. गर्डर तयार झाल्यानंतर त्याला क्रेनच्या मदतीने हटविण्यात येते. पोलादाच्या मोठ्या ढाच्यात पोलाद आणि क्राँक्रिट टाकून तयार करण्यात येते. प्रकल्पात क्राँक्रिट तयार करण्यासाठी मोठे युनिट आहे. मजबुतीसाठी क्राँक्रिटची योग्य मिक्सिंग आवश्यक असते. या प्रकल्पात २०० पेक्षा कामगार काम करीत आहेत. बॉक्स गर्डरवर मेट्रो रेल्वेसाठी रुळ टाकण्यात येणर आहे. यावर दोन ट्रॅक (अप-डाऊन) राहील. पुलाखाली दोन पिलरमध्ये १० गर्डर राहतील. त्याच्या मजबुतीसाठी स्टीलच्या (एचटीसी) तारांनी एक दुसऱ्याला बांधण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

वेळेची बचत होणार
प्री-कास्ट तंत्रज्ञानात गुणवत्ता असते. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत काम होते. दिल्ली मेट्रो रेल्वेच्या पुलात लावलेल्या गर्डरच्या तंत्रज्ञानाने तयार होत आहे. पण येथे आकारमानात आंशिक बदल करण्यात आला आहे. शहरात काम करताना सुरक्षा आणि वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून सेगमेंटल प्री-कास्ट बॉक्स गर्डर सर्वोत्तम आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या बॉक्सला साईटवर तयार करणे कठीण आहे. तयार गर्डर निश्चित अंतरावर बसविण्यात येणार आहे.
-बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.

Web Title: Construction of girder box for Metro rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.