जागेअभावी घराचे बांधकाम अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:10+5:302021-02-11T04:10:10+5:30
बेलोना : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेलोना येथे मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात आले आहे. परंतु जागेअभावी व जागा ...
बेलोना : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेलोना येथे मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात आले आहे. परंतु जागेअभावी व जागा नावाने नसल्यामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहे. बेलोना येथे अनेकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून कच्चे घरे बांधली. त्यातील अनेकांचे घरकुल योजनेत नाव समाविष्ट करण्यात आले. पण जागा त्यांच्या मालकीची नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने बांधकामाची परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांना घर कुठे बांधावे, असा प्रश्न पडला आहे. काहींना घरकुल मिळाले असताना जागा त्यांच्या नावावर नसल्याने व कुटुंबातील इतर सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना घरकुल बांधण्यास मज्जाव करण्यात येत आहे. इंदिरानगर परिसरात सरकारी जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून कच्ची घरे बांधली आहेत. येथे शासनाने पट्टे वाटप केल्याने अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.