राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार

By आनंद डेकाटे | Published: May 5, 2023 05:15 PM2023-05-05T17:15:02+5:302023-05-05T17:15:43+5:30

Nagpur News आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याकडे राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे दिली.

Construction of hostels of all ashram schools in the state will be completed within two years | राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार

राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार

googlenewsNext

आनंद डेकाटे 

नागपूर : आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याकडे राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे दिली.


नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतीगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन डॉ. गावित यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, नागपूर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावडे, कवडस गावाच्या सरपंच उषा सावळे उपस्थित होते .
डॉ. गावित म्हणाले, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आदिवासी विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या वसतीगृहांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यानंतर आश्रमशाळांतील निवासी शिक्षकांसाठी उत्तम निवाससेवा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधीक्षक दीपक हेडाऊ यांनी प्रास्ताविक केले तर आश्रमशाळेच्या प्राचार्य विजया खापर्डे यांनी आभार मानले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या नियमित परीक्षा घेणार
आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यातून तर शिक्षकांची दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. गावित यांनी दिली.
आश्रम शाळेतील हुशार मुलांसाठी शाळेतच वेगळे वर्ग भरविण्यात येतील. तर विद्यार्थ्यांना आकलनात कठीण ठरणाऱ्या विषयांसाठी व्हरच्युअल वर्ग घेण्यात येतील. क्रीडाक्षेत्रात गती असणाऱ्या विद्यार्थांसाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्रीडा साहित्य पुरविण्यात येईल व क्रीडांगण सुसज्ज करण्यात येतील असेही डॉ. गावित यांनी संगितले.

Web Title: Construction of hostels of all ashram schools in the state will be completed within two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.