नागपुरात मिशी कापल्यावरून ग्राहक व न्हाव्यात जुंपली; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:44 IST2019-07-17T14:43:19+5:302019-07-17T14:44:30+5:30
न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपारी घडली.

नागपुरात मिशी कापल्यावरून ग्राहक व न्हाव्यात जुंपली; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपारी घडली.
येथील हनुमाननगरमध्ये असलेल्या फ्रेंडस जेंटस पार्लरमध्ये किरण किसन ठाकूर हे मंगळवारी (१६) दाढी करायला गेले होते. त्यावेळी त्यांची परवानगी न घेता न्हाव्याने त्यांची मिशीही काढून टाकली. यावर संतप्त होऊन त्यांनी सलूनचे मालक सुनील लक्षणे यांच्याशी वाद घातला. त्यावर लक्षणे यांनी प्रत्युत्तर देताना, तुम्हाला जे करायचे ते करा, असे सुनावले. या धमकीची तक्रार ठाकूर यांनी कन्हान पोलीस ठाण्यात नोंदवली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला आहे.