पीपल रियलिटीजला ग्राहक आयोगाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:19+5:302021-07-26T04:07:19+5:30

नागपूर : महिला ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे पीपल रियलिटीजला एका प्रकरणात अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका सहन ...

Consumer Commission slaps People Realities | पीपल रियलिटीजला ग्राहक आयोगाची चपराक

पीपल रियलिटीजला ग्राहक आयोगाची चपराक

Next

नागपूर : महिला ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे पीपल रियलिटीजला एका प्रकरणात अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका सहन करावा लागला. आयोगाने पीडित महिला ग्राहकाचे ४ लाख ५० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश पीपल रियलिटीजला दिला. व्याज २१ मार्च २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. याशिवाय, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ४० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम पीपल रियलिटीजनेच द्यायची आहे.

रिना अग्रवाल असे महिला ग्राहकाचे नाव असून, त्या तुमसर, जि. भंडारा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. पीपल रियलिटीजला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. अन्यथा, पुढील कालावधीसाठी रोज ५० रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई लागू होईल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, अग्रवाल यांनी पीपल रियलिटीजच्या मौजा तुरकमारी, ता. हिंगणा येथील ले-आउटमधील एक भूखंड नऊ लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी २३ मार्च २०१८ रोजी करार केला. तसेच, पीपल रियलिटीजला ४ लाख ५० हजार रुपये अदा केले. त्यानंतर पीपल रियलिटीजने अग्रवाल यांना विविध कारणे सांगून भूखंडाचे विक्रीपत्र करून दिले नाही. त्यामुळे अग्रवाल यांनी पीपल रियलिटीजला कायदेशीर नोटीस बजावली, पण त्याचीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. पीपल रियलिटीजने ग्राहक आयोगासमक्षदेखील हजर होऊन स्वत:ची बाजू मांडली नाही. करिता, अग्रवाल यांच्या तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला.

----------------

ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाले

पीपल रियलिटीजने अग्रवाल यांच्याकडून २०१८ पासून ४ लाख ५० हजार रुपये स्वीकारले आहेत. परंतु, त्यांना करारातील अटीनुसार, ले-आऊट मंजूर किंवा नामंजूर झाल्‍याबाबत कळविले नाही. तसेच, मान्‍य केलेल्‍या व्‍याजदरासह रक्‍कमही परत केली नाही. पीपल रियलिटीजने सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला. त्यामुळे अग्रवाल यांना शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागले असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले.

Web Title: Consumer Commission slaps People Realities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.