सोनी इंडियाला ग्राहक मंचचा दणका :  दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:15 AM2020-01-04T00:15:56+5:302020-01-04T00:18:02+5:30

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट विकण्याच्या प्रकरणात सोनी इंडिया कंपनीला दणका दिला. मंचद्वारे तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले.

Consumer forum hits Sony India : defective mobile handset | सोनी इंडियाला ग्राहक मंचचा दणका :  दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट दिला

सोनी इंडियाला ग्राहक मंचचा दणका :  दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट दिला

Next
ठळक मुद्देकिंमत सात टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट विकण्याच्या प्रकरणात सोनी इंडिया कंपनीला दणका दिला. मंचद्वारे तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले.
सुनील सिन्नरकर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. सिन्नरकर यांना मोबाईल हॅन्डसेटच्या किमतीचे २३ हजार ९६० रुपये व त्यावर सात टक्के व्याज अदा करण्यात यावे, असा आदेश मंचने सोनी कंपनीला दिला. २३ हजार ९६० रुपयावर ४ ऑगस्ट २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले. तसेच, सिन्नरकर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५००० व तक्रार खर्चापोटी २००० अशी एकूण ७००० रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम कंपनीनेच द्यायची आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
तक्रारीवर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजने यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तक्रारीतील माहितीनुसार, सिन्नरकर यांनी १ एप्रिल २०१६ रोजी २३ हजार ९६० रुपयात सोनी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट खरेदी केला होता. आठ महिन्यानंतर मोबाईल हॅन्डसेटमध्ये ओव्हर हिटिंगची समस्या यायला लागली. त्यामुळे कॅमेरा व इतर फंक्शन्स बरोबर काम करीत नव्हते. दरम्यान, मोबाईल हॅन्डसेट काहीवेळा नि:शुल्क दुरुस्त करून देण्यात आला. परंतु, तो हॅन्डसेट पूर्णपणे दुरुस्त झाला नाही. त्यामुळे सिन्नरकर यांना नवीन मोबाईल हॅन्डसेट खरेदी करावा लागला. दरम्यान, त्यांनी सोनी कंपनी व इतरांविरुद्ध मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचची नोटीस तामिल झाल्यानंतर सोनी कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:च्या समर्थनार्थ विविध मुद्दे मांडले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी मंचने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.

अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब
सोनी कंपनीने ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठवून मोबाईल हॅन्डसेटची किंमत परत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तक्रारकर्त्याला अद्याप ती रक्कम मिळाली नाही. हॅन्डसेट दोषपूर्ण होता हे कंपनीने अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कंपनीकडून दोषपूर्ण सेवा व अनुचित व्यापाराचा प्रकार घडला आहे असे निरीक्षण मंचने या निर्णयात नोंदवले.

Web Title: Consumer forum hits Sony India : defective mobile handset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.