ग्राहक मंच : शेतकऱ्यांना चार लाख रुपये अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:35 PM2020-12-31T23:35:20+5:302020-12-31T23:36:59+5:30

farmers relief सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्‍याचे काम स्वीकारल्यानंतर सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दोन तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी चार लाख रुपयांवर रक्कम अदा करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला दिले.

Consumer Forum: Pay Rs 4 lakh to farmers | ग्राहक मंच : शेतकऱ्यांना चार लाख रुपये अदा करा

ग्राहक मंच : शेतकऱ्यांना चार लाख रुपये अदा करा

Next
ठळक मुद्दे गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्‍याचे काम स्वीकारल्यानंतर सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दोन तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी चार लाख रुपयांवर रक्कम अदा करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला दिले. मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हे प्रकरण निकाली काढले.

पंजाब ढवळे व अंबर ढवळे अशी शेतकऱ्यांची नावे असून, ते नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची मौजा-मसोद (कामठी) येथे शेतजमीन आहे. त्यांना राष्‍ट्रीय फलोत्‍पादन विकास योजनेंतर्गत २९ डिसेंबर २०१७ रोजी सामूहिक शेततळे मंजूर करण्‍यात आले होते. दरम्यान, त्यांनी गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला १ लाख ४५ हजार रुपयांत सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्‍याचे काम दिले. हे काम ५ जून २०१९ पूर्वी पूर्ण करायचे होते. परंतु, कॉर्पोरेशनने ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण केले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे तक्रारकर्त्यांचे विविध प्रकारचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली होती.

असे आहेत आदेश

१ - तक्रारकर्त्या शेतकऱ्यांचे १ लाख ४५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह (२७ मे २०१९ पासून) परत करण्यात यावे.

२ - सामूहिक शेततळे खोदकाम करण्‍याकरिता झालेल्या खर्चापोटी १ लाख ५९ हजार ७०० रुपये नुकसान भरपाई अदा करावी.

३ - कापूस व मूग पिकाच्या नुकसानपोटी ३० हजार रुपये द्यावे.

४ - शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये अदा करावे.

५ - या आदेशांचे एक महिन्यात पालन करण्यात अपयश आल्यास पुढील कालावधीसाठी रोज २५ रुपये भरपाई देय होईल.

Web Title: Consumer Forum: Pay Rs 4 lakh to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.