कळमेश्वर तालुक्यात कंटेनमेंट झाेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:42+5:302021-04-27T04:08:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्याला राेखण्यासाठी प्रशासनाने कळमेश्वर ब्राह्मणी शहरासह तालुक्यातील एकूण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्याला राेखण्यासाठी प्रशासनाने कळमेश्वर ब्राह्मणी शहरासह तालुक्यातील एकूण ७८ गावांमध्ये कंटेनमेंट झाेन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार केले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार सुजाता गावंडे व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी संयुक्तरित्या दिली.
ग्रामीण भागात १३१ प्रतिबंधित क्षेत्र तयार केल्याची माहिती नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी दिली असून, कळमेश्वर ब्राह्मणी शहरात ४७९ मिनी प्रतिबंधित क्षेत्र तयार केल्याचे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले. शहरासह तालुक्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या दाेन्ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कळमेश्वर ब्राह्मणी शहरात ११ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. शहरातील वाॅर्ड क्रमांक-१४ मध्ये पाच तर वाॅर्ड क्रमांक-१२ मध्ये दाेन प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहेत. आणखी काही प्रतिबंधित व मिनी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली.
तालुक्यातील ७८ गावांमध्ये काेराेनाचे संक्रमण माेठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गावांमध्ये १२० प्रतिबंधित तर ४९७ मिनी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील इतर नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे व गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सुजाता गावंडे यांनी सांगितले.