पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:12 AM2017-09-21T01:12:13+5:302017-09-21T01:12:26+5:30

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले.

Contingency planes for five planes | पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग

पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग

Next
ठळक मुद्देमुंबईत मुसळधार पाऊस : सकाळच्या विमानाचे सायंकाळी उड्डाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले. याशिवाय मंगळवारी इंडिगोचे कोलकाता-मुंबई, आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँकॉक-मुंबई आणि बुधवारी चंदीगड-मुंबई अशा एकूण पाच विमानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लँडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि शेकडो प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले. याशिवाय बुधवारी सकाळी ८ वाजता मुंबईकडे उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान सायंकाळी ६ वाजता मुंबईकडे रवाना झाले. याशिवाय बुधवारी जेट एअरवेज, इंडिगो, एअर इंडिया व गो-एअर ही चार कंपन्यांची नागपुरातून मुंबईकडे जाणारी विमाने रद्द करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी नागपूरहून रात्री ९ वाजून २० मिनिटांनी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला मुंबईच्या विमानतळावर उतरण्यास मनाई करण्यात आल्याने ते ११ वाजून २० मिनिटांनी नागपूर विमानतळावर माघारी आले. चंदीगड-मुंबईचे विमान बुधवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले आणि दुपारी ४ वाजता मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
एअर इंडिया कंपनीने विमानातील प्रवाशांची कुठलीही सोय केली नाही, असे सूत्रांनी सांगितले. नागपूरचे प्रवासी घरी गेले, पण मुंबई येथील प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले. यातच या विमानात झिम्बाब्वेचे १९ वर्षांखालील टीमचे २२ सदस्यही विमानतळावर अडकले होते रात्री येणाºया दोन आंतरराष्ट्रीय विमानांचे कारण देत नागपूरच्या विमानतळावरील प्रसाधनगृहेही विमानतळ प्रशासनाने बंद केली. या संपूर्ण प्रकारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक प्रवासी, महिला आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागला.

Web Title: Contingency planes for five planes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.