सततच्या पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:45+5:302021-09-24T04:09:45+5:30

काटोल : काटोल तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सोंगणीला आले आहे. मात्र अतिपावसामुळे शेतात ओलावा कायम असल्याने मळणीयंत्र कसे ...

Continuous rains hit crops | सततच्या पावसाचा पिकांना फटका

सततच्या पावसाचा पिकांना फटका

Next

काटोल : काटोल तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सोंगणीला आले आहे. मात्र अतिपावसामुळे शेतात ओलावा कायम असल्याने मळणीयंत्र कसे न्यायचे आणि सोंगणी कशी करायची, असा पेच शेतकरी बांधवांना पडला आहे.

पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सात सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने तालुक्यातील जलाशये १०० टक्के भरल्या गेली. मात्र सतत सुरू असलेल्या पावसाने नदी-नाल्या काठावरील शेती पुलामुळे खरडून गेली आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे. इकडे सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळवटल्या जात असून अंकुर फुटत आहे. कपाशी चांगली असली तरी बोंडे काळे पडत आहे. संत्राए मोसंबीची गळ अद्यापही कायम आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलकोबीची लागवड असते. या पिकालासुद्धा पावसाचा मोठा फटका बसला आहे.

शेतात चिखल .....

कपाशीवर चुरडा पडल्याने पाने चिकटत आहेत. तण वाढले आहे. फवारणी आवश्यक आहे. मात्र, शेतात पायच ठेवता येत नसल्याने फवारणी, डवरणी आणि तणनाशक मारायचे कसे, हा प्रश्न आहे. सोनोली शिवारातील शेतकरी सागर भैस्वार यांच्या शेतातील १० टनाच्यावर मोसंबी खाली आली. त्यांचे साडेतीन एकरातील कोबीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे.

--

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. तालुक्यात सोयाबीन, संत्रा मोसंबी, कापूस व तूर या मुख्य पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून येत आहे.

सुरेश कन्नाके

तालुका कृषी अधिकारी

230921\img-20210923-wa0151.jpg~230921\img-20210923-wa0153.jpg~230921\img-20210923-wa0152.jpg

सततच्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतात अश्याप्रकारे पाणी साचल्याचे चित्र आहे~कोबी लागवड असलेल्या शेतात फुल कोबीची अवस्था अशी झाली आहे~कृषी विभागाचे अधिकारी पीक नुकसानीची पाहणी करताना

Web Title: Continuous rains hit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.