मर्जीतल्यांना कंत्राट; नियमांमध्ये बदल

By admin | Published: June 30, 2016 02:58 AM2016-06-30T02:58:38+5:302016-06-30T02:58:38+5:30

नागपूर महानगरपालिकेत मर्जीतल्या व्यक्तीलाच काम दिले जात असल्याचे नेहमी ऐकायला मिळते.

Contract for Goods; Changes to the rules | मर्जीतल्यांना कंत्राट; नियमांमध्ये बदल

मर्जीतल्यांना कंत्राट; नियमांमध्ये बदल

Next

महापालिकेचा प्रताप : कमी दरात काम करणाऱ्याचा प्रस्ताव नामंजूर
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत मर्जीतल्या व्यक्तीलाच काम दिले जात असल्याचे नेहमी ऐकायला मिळते. सिमेंट काँक्रिट रोड फेज-२ चे काम देताना असाच प्रकार उघडकीस येत आहे. येथे ज्या कंपन्यांविरुद्ध वेगवेगळ्या विभागांमध्ये चौकशी सुरू आहे, त्यांनाच सिमेंट रोडचे काम देण्यात आले आहे. काही ठेकेदार १२ ते १५ टक्के कमी दरात काम करण्यास तयार होते. त्यांच्यात तांत्रिक त्रुटी काढून त्यांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
मनपा स्थायी समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत नागपुरातील अभी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेडच्या २९.१६ कोटींच्या दोन पॅकेजच्या प्रस्तावाला मनमानी पद्धतीने नामंजूर करण्यात आले. पेवमेंट क्वॉलिटी काँक्रिट (पीक्यूसी)च्या मुद्यावर त्यांना काम देण्यात आले नाही. उलट त्यांना पीक्यूसी आधारावर काम करण्याचा अनुभव आहे तर दुसरीकडे आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेडला सीमेंट रोडचे काम देण्यात आल्याची माहिती आहे. ठक्कर असोसिएट्सचा सुद्धा एक प्रस्ताव आला होता. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टच्या विरुद्ध मुंबई महापालिकेत चौकशी सुरू आहे. तर सिंचन प्रकल्पातील अनियमितता प्रकरणात ठक्कर असोसिएट्सची चौकशी सुरू आहे. संबंधित कंपनीला कोट्यवधी रुपयांचे सीमेंट रोडचे काम देण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेत कंत्राटदाराची चौकशी
मर्जीतल्यांना कंत्राट; नियमांमध्ये बदल
नागपूर : यातून महापालिकेत आपल्या शुभचिंतकालाच साथ दिली जात असल्याची बाब दिसून येते. सीमेंट रोड प्रकल्पात आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला दोन पॅकेजचे काम मनपा प्रशासनाने जारी केले आहे. संबंधित कंपनीने कामाला सुरुवातसुद्धा केली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेत संबंधित कंत्राटदाराची चौकशी सुरू आहे.
याबाबत तक्रार मिळाल्यानंतर मनपा प्रशासनाने आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला दिलेली दोन कामे थांबवून ठेवली. त्याचप्रकारे ठक्कर असोसिएट्सला एका पॅकेजचे काम देण्यात येणार होते.
प्रस्ताव जवळपास मंजूर होण्याची स्थितीत होता. परंतु सिंचन प्रकल्पातील अनियमिततेत संबंधित कंपनीने नाव आले असल्याने त्यांचाही प्रस्ताव थांबवण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत यांनी अभी इंजिनियरिंगचा प्रस्ताव नामंजूर करताना असे कारण दिले होते की, कंपनीला पीक्यूसीमध्ये काम करण्याचा अनुभव नाही. मुळात अभी इंजिनियरिंंगने सर्व संबंधित दस्तऐवज सादर केले होते. तरीही त्यांचा प्रस्ताव नाकारला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. (प्रतिनिधी)

मनपात कंत्राटदारांची लॉबी सक्रिय
नागपूर महापालिकेशी संबंधित प्रकल्पांकडे कंत्राटदारांच्या लॉबीचे बारीक लक्ष लागून असते. कुठल्याही प्रकल्पाच्या कामात लॉबीबाहेरच्या कंत्राटदाराला शिरू दिले जात नाही. लॉबीबाहेरच्या कंत्राटदाराचे काम अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने अटकविले जाते, असेही आरोप लागले आहेत.
पारदर्शी पद्धतीने कामे देण्यात आली
मनपाचे सिटी इंजिनियर एम.एच. तालेवार यांनी सांगितले की, सीमेंट रोडची निविदा प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्यांदा निविदा काढण्यात आली, तेव्हा निविदाकार आले नव्हते. त्यामुळे कालावधी वाढवण्यात आला. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला दोन कामे जारी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध कुठलीही चौकशी सुरू नव्हती. जेव्हा मुंबई महापालिकेत त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली तेव्हा त्यांच्या दोन नवीन प्रस्तावांना रोखण्यात आले. स्थायी समितीमध्ये संबंधित दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली होती. परंतु चौकशी समिती बसल्यानंतर तातडीने प्रस्ताव रोखण्यात आला. तर सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यात नाव आल्याने ठक्कर असोसिएट्सचा एक प्रस्ताव रोखण्यात आला. कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही.

Web Title: Contract for Goods; Changes to the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.