ताबा न घेणाऱ्या विक्रेत्यांचा करार संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:52+5:302021-03-27T04:07:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी मासोळी बाजारात विक्रेत्यांना ओटे देण्यात आले आहेत. परंतु त्या ठिकाणी मासे विक्रेते आलेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी मासोळी बाजारात विक्रेत्यांना ओटे देण्यात आले आहेत. परंतु त्या ठिकाणी मासे विक्रेते आलेले नाहीत. राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्डच्या ९० टक्के अनुदानातून येथे किरकोळ मछली विक्रेत्यांसाठी १०८ ओटे व ठोक व्यापाऱ्यांसाठी चार दुकाने, बर्फ कारखाना, शीतगृह, लिलाव सभागृह आदी तयार करण्यात आले. मनपा स्थायी समितीतर्फे १०४ किरकोळ विक्रेत्यांना ओटे वाटप करण्यात आले. ७९ किरकोळ विक्रेत्यांशी मनपाने करार केला. परंतु यापैकी बहुतांश विक्रेते या ओट्यांचा वापरच करीत नाही आहेत. यामुळे मनपा संपत्ती कर विभागाने स्थायी समितीमध्ये एक प्रस्ताव आणला आहे. याअंतर्गत ज्या विक्रेत्यांनी ओट्यांचा ताबा घेतला नाही, त्यांचा करार रद्द केला जाईल. ३० जून २०१५ ची यादी रद्द केली जाईल. त्याचप्रकारे मंगळवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत सिक्युरिटी गार्डची नियुक्ती, आरोग्य विभागाकडून कीटकनाशक औषध आदी खरेदीचा प्रस्ताव आहे. तसेच हॉटमिक्स प्लांट विभागातर्फे बांधकाम साहित्याच्या खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
प्रशासनाला घेरण्याची संधी
मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पावर सत्तापक्ष नाराज आहे. शहर विकासाशी संबंधित विकास कामांना बजेटमध्ये सामील करण्यात आले नसल्याचा आरोपसुद्धा केला गेला. त्यानंतर आता होळीच्या दुसऱ्या दिवश मंगळवारी मनपा स्थायी समितीची बैठक होणार आहे. यात स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्याकडे प्रशासनाला घेरण्याची संधी आहे.