पोषण आहाराच्या पुरवठ्याचा कंत्राट संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:38+5:302021-08-19T04:09:38+5:30
नागपूर : शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्याने ऑगस्ट महिन्याच्या पोषण आहाराचा पुरवठा थांबला आहे. तूर्तास, ...
नागपूर : शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्याने ऑगस्ट महिन्याच्या पोषण आहाराचा पुरवठा थांबला आहे. तूर्तास, कधी पुरवठा होईल याचा कुठलाही अंदाज शिक्षण विभागाला नसल्याने विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहण्याची वेळ आहे़
शिक्षण संचालनालयाने जून व जुलैचा ४० दिवसाचा आहार पाठविला होता तर एप्रिल व मे च्या आहाराची रक्कम डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याचा आहार ऑगस्टच्या १० तारखेपर्यंत मिळणे क्रमप्राप्त होते़ मात्र, पुरवठादारांचे जिल्ह्यातील कंत्राट २९ जुलैला तर राज्यातील कंत्राट हे २० जुलैला संपले आहे़ शिक्षण संचालनालयाने कंत्राट संपण्यापूर्वीच नवा पुरवठादार नियुक्त करणे आवश्यक असताना ही प्रक्रिया पूर्ण केली नाही़ नागपूर जिल्ह्यातील कंत्राट हे महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशनला देण्यात आले होते़ शासन स्तरावरून नवीन पुरवठादार नियुक्त झाल्यानंतर अथवा जुन्याच पुरवठादाराला मुदतवाढ दिल्यानंतरच आहाराचा पुरवठा होणार आहे.
- आहारापासून वंचित विद्यार्थी
इयत्ता पहिली ते पाचवीचे विद्यार्थी - १ लाख ६२ हजार ६९५
इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी - १ लाख ३५ हजार ४१८