कंत्राटदार आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनीचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:28 PM2018-12-12T22:28:13+5:302018-12-12T22:29:20+5:30

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. अपूर्ण काम महामेट्रोतर्फे सध्या काम सुरू असलेल्या कंत्राटदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली.

Contractor IL & FS Company become insolvent | कंत्राटदार आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनीचे दिवाळे

कंत्राटदार आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनीचे दिवाळे

Next
ठळक मुद्देमहामेट्रोकडून स्टेशन बांधकामाचे कंत्राट रद्द : अपूर्ण बांधकाम महामेट्रो पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. अपूर्ण काम महामेट्रोतर्फे सध्या काम सुरू असलेल्या कंत्राटदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली.
कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यामुळे कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यामुळे कंपनीचे प्रकरण ‘एनसीएलटी’कडे प्रलंबित आहे. कंपनीला एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डी या रिच-१ मार्गावर दहा मेट्रो स्टेशनचे काम ५३२.६७ कोटी रुपयांत मिळाले होते. लेटर आॅफ एक्सेपटेंस मिळाल्यानंतर कंपनीला तारखेपासून ११० आठवड्यात स्टेशनचे बांधकाम करायचे होते. कंपनीने काम वर्ष २०१६ मध्ये सुरू केले होते. मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये उत्तर काँग्रेसनगर ते खापरीपर्यंतच्या दहा स्टेशनमध्ये सात एलिव्हेटेड आणि तीन जमिनीवरील स्टेशनचा समावेश होता. आतापर्यंत तीन स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित सात स्टेशनचे काम वेगात पूर्ण करण्यात येणार आहे. कंत्राट रद्द झाल्यामुळे काम थांबणार नाही किंवा महामेट्रोच्या कामाच्या वेगावर काहीही परिणाम होणार नसल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

Web Title: Contractor IL & FS Company become insolvent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.