गोळ्या घालण्याचा फलक ठरला वादग्रस्त

By admin | Published: January 25, 2017 02:58 AM2017-01-25T02:58:33+5:302017-01-25T02:58:33+5:30

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात,

Controversial decision making tablet | गोळ्या घालण्याचा फलक ठरला वादग्रस्त

गोळ्या घालण्याचा फलक ठरला वादग्रस्त

Next

आंदोलकांना सूचना देण्याचा हेतू होता : पोलिसांचा खुलासा
नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात, तशी ती केवळ एक सूचना होती. गोळी चालविण्याचा फलक दाखविणे म्हणजे आंदोलकांवर पोलिस गोळी चालविणार आहे, असे नव्हे. तसा आम्ही विचारही करू शकत नाही, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले.
हे राम, नथुराम नाटकाचा प्रयोग रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगाला विरोध करणाऱ्यांना आंदोलकांसमोर शहर पोलिसांनी एक फलक दाखवला.
‘सुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी।
चले जाव। चले जाव। चले जाव।’असे त्यात नमूद होते.
लोकमतने आज त्या फलकासंबंधाचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत या वादग्रस्त फलकाचा विषय पत्रकारांनी लावून धरला. पोलिसांनी असा फलक दाखवण्यामागे काय उद्देश होता, गोळी घालण्याची ही धमकी पोलीस कशी देऊ शकतात, ते कोणत्या कायद्यात बसते, असे एक ना अनेक प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त शर्मा म्हणाले,
गोळी घालण्याचा इशारा देणारे फलक दाखविणे म्हणजे धमकी नव्हे. आंदोलनाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. त्यामुळे ते आंदोलन गैरकायदेशीर ठरते. कोणत्याही ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमविणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. अशावेळी सुरक्षा यंत्रणेतर्फे सुरक्षासंबंधाने आंदोलनकर्त्यांना सूचना दिल्या जातात. त्याला जुमानत नसेल आणि परिस्थिती चिघळत असेल तर पोलीस आंदोलकांवर पाण्याचा मारा, लाठीमार, अश्रुधूर सोडतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही सूचनांचे दोन फलक दाखविले. मात्र, दुसरा फलक कुणी ध्यानात घेतला नाही आणि या फलकाचा गैरसमज करण्यात आला.

Web Title: Controversial decision making tablet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.