पेट्रोल पंपावर भाईगिरी पडली महागात; महिलेला महिला कर्मचाऱ्यांचा बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 11:51 AM2021-12-10T11:51:33+5:302021-12-10T12:04:20+5:30

पेट्रोल पंपावर भाईगिरी करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. तिने एका पुरुष कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे पाहून संतप्त झालेल्या पंपावरच्या कर्मचारी महिलांनी या महिलेला बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

controversy over drops of petrol on clothes women fighting video goes viral | पेट्रोल पंपावर भाईगिरी पडली महागात; महिलेला महिला कर्मचाऱ्यांचा बेदम चोप

पेट्रोल पंपावर भाईगिरी पडली महागात; महिलेला महिला कर्मचाऱ्यांचा बेदम चोप

Next
ठळक मुद्देव्हिडिओ व्हायरल, प्रकरण पोलिसात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : येथील पेट्रोल पंपावरमहिला कर्मचाऱ्यांनी एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेडिकल चौकात ही घटना घडली असून कपड्यावर थेंब उडाल्यावरून त्यांच्यात वाद झाला असून कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडाल्यावरुन वाद झाल्यानंतर ही मारामारी झाल्याचा आरोप आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मेडिकल चाैकातील पेट्रोल पंपावर बुधवारी दुपारी दुचाकीचालक महिला पेट्रोल घेण्यासाठी आली होती. पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातून चुकून हॅण्डल मागेपुढे झाल्याने तिच्या कपड्यावर पेट्रोलचे शिंतोडे उडाले. त्यामुळे ही महिला संतापली. तिने पुरुष कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केले. त्याने विरोध केला असता बाजूचा कचऱ्याचा मोठा डबा (डस्टबीन) उचलून पुरुष कर्मचाऱ्याला फेकून मारला.

ते पाहून बाजूला पेट्रोल भरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता भाईगिरी करणाऱ्या महिलेने त्यांच्याशीही असभ्य वर्तन केले. त्यामुळे संतापलेल्या तीन कर्मचारी महिलांनी तिला बेदम चोप दिला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर झाला असून तो खऊपच व्हायरल होत आहे. यानिमित्त पेट्रोल दरवाढीचा परिणाम असाही.. असे म्हणत वेगवेगळ्या गमतीशीर चर्चाही जोरात सुरू आहे.

महिलेला कुटुंबीयांसमोर समज

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे पंपावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच इमामवाडा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘अदखलपात्र’ अशी नोंद केली. महिलेच्या कुटुंबीयांना ठाण्यात बोलवून तिला समज दिल्यानंतर तिला कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.

Web Title: controversy over drops of petrol on clothes women fighting video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.