‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

By admin | Published: April 24, 2017 01:54 AM2017-04-24T01:54:43+5:302017-04-24T01:54:43+5:30

स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच ...

Cooperate to control 'swine flu' | ‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

Next

चंद्रशेखर बावनकुळे : आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठक
नागपूर : स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच व्हेंटिलेटर व आयसीयु असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ रुग्ण दगावले आहे. या आजारावर तात्काळ नियंत्रण तसेच आवश्यक औषधोपचार या संदर्भात आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र्र सवई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रामनाथ सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे, डॉ. प्रफुल्ल पांडे, डॉ. पोद्दार, डॉ. गिल्लुरकर आदी तज्ज्ञ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आजाराबाबत जागृती मोहीम राबविणार
स्वाईन फ्लू आजारासंदर्भात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती असावी या दृष्टीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू या आजाराबद्दल तसेच घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेनेही पॅनिक होऊ नये, असे आवाहन केले.

घाबरू नका खबरदारी घ्या
स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य असून नागरिकांनी या आजाराबाबत न घाबरता हा आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार विनाविलंब सुरू करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये व फ्लूची लक्षणे असतील तर हस्तांदोलन न करण्याची काळजी घ्यावी असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.

नागपुरात २२ रुग्णांमध्ये लक्षणे
जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नवाडे यांनी माहिती देताना सांगितले की, नागपूर शहर व ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २२ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. तर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे यांनी महानगरपालिकेतर्फे ३४ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.

Web Title: Cooperate to control 'swine flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.