आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:06 PM2019-03-11T22:06:08+5:302019-03-11T22:08:29+5:30

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

Cooperate with the implementation of Model Code of Conduct: Collector Ashwin Mudgal | आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

Next
ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात प्रत्येकी २४ असे ४८ फ्लाईट्स स्कॉड राहणार असून २४ तास आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी संदर्भात देखरेख करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांची कार्यक्रम रॅली आदीवर नजर ठेवण्यासाठी व्हिडीओ व्हिजिलन्स टीम गठित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खचासंबंधी दैनंदिन नोंदी ठेवण्यात येणार असून उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होत्या.
या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बंडोपंत टेभुर्णे, युवराज लाडे, बसपाचे उत्तम शेवडे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अरुण लाटकर, रामेश्वर चरपे, बहुजन समाज पार्टीचे आकाश खोब्रागडे, भारतीय जनता पक्षाचे डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, भोजराज डुंबे, संजय टेकाडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन धांडे, भाकपचे श्याम काळे, अरुण वनकर, मनसेचे घनश्याम निखाडे तसेच सुनील मानेकर आदी विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी यांचा आधार
मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी ते मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ११ पैकी एक फोटो ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. आवश्यक ओळखपत्र खालीलप्रमाणे
१) पारपत्र (पासपोर्ट),
२) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
३) केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम,
४) सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र,
५) बँक, पोस्टद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक,
६) पॅन कार्ड,
७) रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड,
८) मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड, केंद्र सरकारच्या
९) छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कागदपत्र
१०) खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र (केवळ त्यांच्या स्वत:साठी)
११) आधार कार्ड
१५ मार्चपर्यंत मतदार नोंदणी
नवमतदारांसाठी दोनवेळा विशेष अभियान राबविण्यात आले आहे. परंतु मतदार नोंदणी अजूनही सुरूच आहे. ती येत्या १५ मार्चपर्यंत सुरू राहील. ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या मतदार नोंदणीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानंतर नोंंदणी करणाऱ्या मतदारांची पुरवणी यादी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
एकूण मतदार - (३१ जानेवारीपर्यंत)

लोकसभा            पुरुष                   महिला             तृतीयपंथी               एकूण मतदार
मतदार संघ

नागपूर               १०,८०,५७४       १०,४५,९३४          ६६                        २१,२६,५७४
रामटेक              ९,८५,५३९         ९,१२,०६१             २३                         १८,९७,६२३
-----------------------------------------------------------------------------------
एकूण                 २०,६६,११३        १९,५७,९९५          ८९                        ४०,२४,१९७

Web Title: Cooperate with the implementation of Model Code of Conduct: Collector Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.