गोड बोलण्यापेक्षा सहकार्यातून विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 08:00 AM2019-01-18T08:00:00+5:302019-01-18T08:00:07+5:30

गुड बोला.. गोड बोला या लोकमतच्या प्रभावी उपक्रमात गोड बोलण्याला स्पष्टतेची किनार असण्याविषयी सांगत आहेत, नासुप्र सभापती व महानगर आयुक्त शीतल उगले

Cooperative development than speaking sweet! | गोड बोलण्यापेक्षा सहकार्यातून विकास!

गोड बोलण्यापेक्षा सहकार्यातून विकास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. नियमानुसार काम होत नसेल तर स्पष्ट सांगणे गरजचे आहे. परंतु त्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होत असेल तर तिच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत. अशी भूमिका मांडल्यास समारेच्याचाही गैरसमज होणार नाही. हेही तितकेच महत्त्वाचे.
वस्थापनात लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व कर्मचारी यांच्याशी नुसते गोड बोलून समस्या सुटणार नाही. कामातही गोडी असली पाहिजे. संस्थेशी संबंधित सर्वांच्या सहकार्याने व समन्वयातून विकास व जनतेची कामे व्हावीत, असे मला वाटते.
नागपूर सुधार प्रन्यास, महानगर नियोजन प्राधिकरण संदर्भात अनेकजण कामे घेऊ न येतात. काही लोकांच्या तक्रारीही असतात. येणाऱ्या व्यक्तीशी नुसते गोड बोलून त्यांचे समाधान होणार नाही, समस्याही सुटणार नाही. त्याची नेमकी समस्या जाणून ती सोडविणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या सोडण्यात कायदेशीर अडचणी असल्यास आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला त्याला देणे महत्त्वाचे वाटते. गोड बोलण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे.
आयुक्त व सभापती असल्याने दररोज अनेक नागरिक समस्या घेऊ न येतात. सर्वांसोबत आपण चांगले बोलतो. अशावेळी येणाऱ्यांशी नुसते गोड बोलून भागणार नाही. संबंधित व्यक्तीची समस्या मार्गी लागण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची गरज असते. यासाठी समन्वय महत्त्वाचा असतो. सोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांशी सुसंवाद तितकाच महत्त्वाचा आहे. यातून अनेक प्रश्न मार्गी लागण्याला मदत होते. समस्या घेऊन येणाऱ्याशी नुसते गोड बोलून परत केले तर त्याची बोळवण होईल. त्याची समस्या कशी सुटेल यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. यात अधिकारी व सहकाऱ्यांची सकारात्मक भूमिका तितकीच महत्त्वाची असते.
शासकीय कार्यालयात येणाऱ्यांचे काम व्हावे अशी अपेक्षा असते. त्याची अकारण अडवणूक न करता त्याचे काम तातडीने मार्गी लागले तर संबंधितांचे समाधान होते. काम न करता नुसते गोड बोलणे योग्य नाही. अशा गोड बोलण्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे, समजावून सांगणे आवश्यक आहे.

Web Title: Cooperative development than speaking sweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.