बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:06+5:302021-04-08T04:08:06+5:30

: २४ तास कार्यरत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. तेथील ...

Coordinating room for other information including bed availability | बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्ष

बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्ष

googlenewsNext

: २४ तास कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. तेथील नागरिकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर) निर्मिती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील संपर्क क्रमांक ०७१२-२५६२६६८ असून १०७७ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज केले. समन्वय कक्षातील या क्रमांकावर नागरिकांना चोवीस तास संपर्क करता येऊ शकेल असे ते म्हणाले. आरोग्याची स्थिती ढासळण्यापूर्वी नागरिकांनी नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी. त्यासाठीच समन्वय कक्षाची स्थापना केली आहे.

चौकट

६ मिनिटांची स्वतः करा चाचणी

ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न दवडता उपचार सुरू करावे. गावात आशा व अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ६ मिनिटे चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी व चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर ४ पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे. ताप, सर्दी, खोकला असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

चौकट

ऑक्सिजन साठा मुबलक उपलब्ध

जिल्ह्यात ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुटवड्याची कोणतीही तक्रार नाही. जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांखेरीज भिलाई स्टील प्लान्टवरूनदेखील पुरवठा होत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. रेमडेसिविर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिविरवर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला व हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहेत. खासगी रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न व औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे तसेच चाचण्यांच्या संख्येचे अपलोडिंग व देयक तफावतीतील अपप्रकारांचीदेखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगीतले. नागपूरकरांनी ब्रेक द चेन मधील निर्बंधासह मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Web Title: Coordinating room for other information including bed availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.