विदर्भाच्या लढ्यासाठी समन्वय समिती

By admin | Published: January 15, 2016 03:40 AM2016-01-15T03:40:32+5:302016-01-15T03:40:32+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे.

Coordination Committee for Vidarbha's fight | विदर्भाच्या लढ्यासाठी समन्वय समिती

विदर्भाच्या लढ्यासाठी समन्वय समिती

Next

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे. विदर्भाच्या लढ्याची रूपरेषा ठरविण्यात येणार असून त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
गुरुवारी रामदासपेठ येथील एका हॉटेलात दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खा. दत्ता मेघे, माजी मंत्री रणजित देशमुख, महाराष्ट्राचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, आ. आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, आ. चरण वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अ‍ॅड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, मोहन गायकवाड, अ‍ॅड. मुकेश समर्थ, देवेंद्र पारेख, प्रकाश इटनकर,हरीश इथापे, अरुण बोंदे, प्रमोद पांडे, नितीन रोंघे, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अ‍ॅड. संदेश सिंगलकर, अमिताभ पावडे, अ‍ॅड. दीपक पाटील, धनंजय मिश्रा, जुुगल कोठारी आदींसह विदर्भातून जवळपास ७० ते ७५ लोक उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास सर्वांनीच आपापली मते व्यक्त केली. अनेकांनी सूचनाही केल्या. स्वतंत्र विदर्भासाठी लढा पुकारण्यावर सर्वांचेच एकमत होते. आंदोलनाची पुढची दिशा ठरविणे आणि त्यासाठी सर्वपक्षीय समन्वय समिती स्थापन करणे यावर सर्वांचेच एकमत झाले.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. परंतु यासंदर्भात आता काही उघड करावयाचे नाही, असेही ठरविण्यात आले. लवकरच समितीची घोषणा करून आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Coordination Committee for Vidarbha's fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.