खैरी येथे कोराेना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:28+5:302021-02-23T04:11:28+5:30
कामठी : काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, खैरी (ता. कामठी) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात ...
कामठी : काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, खैरी (ता. कामठी) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात खैरी परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ३५० कामगारांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली.
खैरी ग्रामपंचायतच्या हद्दीत माेठ्या प्रमाणात खासगी कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये रोज शेकडाे कर्मचारी व कामगार काम करतात. यातील बहुतांश कामगार व कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करतात. गावात व या कंपन्यांमध्ये काेराेनाचा फैलाव हाेऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार या शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते, अशी माहिती सरपंच तथा कामठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष माेरेश्वर कापसे यांनी दिली. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक यशवंत घ्यार, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली गोनाडे, विद्या राऊत, उपसरपंच वीणा रघटाटे, आरोग्यसेवक तुषार मून, आरोग्यसेविका संगीता उमाठे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश मानकर, नत्थू ठाकरे, दिलीप ठाकरे उपस्थित होते.