काटोल, हिंगण्याची कोरोना साखळी तुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:00+5:302021-01-21T04:09:00+5:30
काटोल/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना हिंगणा आणि काटोल तालुक्यातील कोरोना साखळी अद्यापही कायम ...
काटोल/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना हिंगणा आणि काटोल तालुक्यातील कोरोना साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत बुधवारी ८३ रुग्णांची नोंद झाली. यात हिंगणा तालुक्यातील १० तर काटोल तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात बुधवारी ६८ नागरिकांच्या चाचण्या झाली. तीत डिगडोह, टाकळघाट व मेटाउमरी येथे प्रत्येकी २ तर वानाडोंगरी, उखळी, रायपूर व हिंगणा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात आतापर्यंत ३,९०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ३,६९१ रुग्ण बरे झाले आहेत. काटोल तालुक्यात ६२ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात काटोल शहरातील सरस्वती नगर येथील ३, तारबाजार येथील २ तर रामदेव बाबा ले-आऊट येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागामध्ये लाडगाव येथे एका रुग्णाची नोंद झाली.