कोरोनाचे १७ रुग्ण, एक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:05+5:302021-07-16T04:08:05+5:30
नागपूर : कोरोनाची चिंता कमी झाली आहे. गुरुवारी १७ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ९ तर ...
नागपूर : कोरोनाची चिंता कमी झाली आहे. गुरुवारी १७ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ९ तर ग्रामीणमध्ये ८ रुग्ण व एक मृत्यू होता. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,४१३ झाली असून मृतांची संख्या ९०३९ वर पोहचली आहे. सध्या कोरोनाचे १११ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ७५४७ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.२२ टक्के होता. शहरात ५९३४ चाचण्यांमधून ०.१५ टक्के तर ग्रामीणमध्ये १६१३ चाचण्यांमधून ०.४९ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सध्या शहरात ३,३२,७५० रुग्ण व ५३०० मृत्यू तर, ग्रामीणमध्ये १,४३,०५० रुग्ण व २३०८ मृत्यूची नोंद आहे. आज शहरातून १२, ग्रामीणमधून ३ असे एकूण १५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,६८,२६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे.
-२८९३ कोरोनाचे बेड रिकामे
विविध शासकीय व खासगी रुग्णालये मिळून कोरोनाचा रुग्णांसाठी २८९३ खाटांची सोय आहे. एप्रिल महिन्यात यातील एक बेडही मिळणे कठीण होते. परंतु आता २८९३ बेड रिकामे आहेत. मेडिकलमध्ये सध्या २७, मेयोमध्ये ६, एम्समध्ये ७, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २ तर, विविध खासगी रुग्णालयात ५४ रुग्ण भरती आहेत.
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ७५४७
शहर : ९ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ८ रुग्ण व १ मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,४१३
ए. सक्रिय रुग्ण : १११
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,२६३
ए. मृत्यू : ९०३९