कोरोना आणि नियमांनी गडबडले मूर्तिकारांचे व्यवस्थापन - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:30+5:302021-09-02T04:18:30+5:30

प्रशासनाने यंदा गणेश मूर्तीला ४ फूट उंचीचे बंधन घातले आहे; पण काही मंडळ आपले वेगळेपण जपण्यासाठी नामी शक्कल लढवत ...

Corona and the rules messed up sculptor's management - additions | कोरोना आणि नियमांनी गडबडले मूर्तिकारांचे व्यवस्थापन - जोड

कोरोना आणि नियमांनी गडबडले मूर्तिकारांचे व्यवस्थापन - जोड

Next

प्रशासनाने यंदा गणेश मूर्तीला ४ फूट उंचीचे बंधन घातले आहे; पण काही मंडळ आपले वेगळेपण जपण्यासाठी नामी शक्कल लढवत असल्याचे दिसून येत आहे. एका मंडळाने मूर्तिकारापुढे काहीतरी वेगळेपणा दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा मूर्तिकाराने नियमांचा भंग न होऊ देता, मूर्तीची उंची ४ फूटच ठेवली; पण रुंदीला निर्बंध नसल्याने ४ बाय २१ फुटांचा गणपती साकारला. निद्रावस्थेतील गणपतीची ही भव्य मूर्ती सध्या आकर्षण ठरत आहे.

- गणेश उत्सवावर महागाईचा परिणाम कधीच झाला नाही; पण कोरोनामुळे मोठा फटका बसला. आमचे ५० टक्क्यांच्या जवळपास काम कमी झाले आहे. उलट रंग, माती व मजुरीचे दर वाढले आहे. त्यामुळे यंदा मूर्ती साकारणे परवडण्यासारखे नाही; पण मूर्तिकलेचे आमचे परंपरागत काम आहे. एकदिवस कोरोना नक्कीच जाईल, नक्कीच सुगीचे दिवस येतील, असा आमचा बाप्पावर विश्वास आहे.

निलेश इंगळे, मूर्तिकार

- घरगुती गणेशाचा वरदहस्त अजूनही आहे

हो मोठ्या मूर्तींची कामे कमी झाली असली तरी, घरगुती गणेशाचा वरदहस्त आमच्यावर आहेच. घरगुती गणपतीच्या स्थापनेत कुठेही कमी आली नाही. फक्त कोरोनामुळे पूर्वी दूरदुरून लोक मूर्ती खरेदीसाठी चितारओळीत यायचे. यंदा ती संख्या कमी आहे. कोरोनामुळे काहींच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी मूर्तीचे आकार कमी केले आहे.

सुहास माहुलकर, मूर्तिकार

Web Title: Corona and the rules messed up sculptor's management - additions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.