नागपूर विद्यापीठात होणार 'कोरोना'ची चाचणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:17 AM2020-04-22T00:17:33+5:302020-04-22T00:19:57+5:30

‘कोरोना’ चाचण्यांमध्ये गती यावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ची चाचणी करणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘आयसीएमआर’च्या पथकाकडून प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले.

Corona to be tested at Nagpur University? | नागपूर विद्यापीठात होणार 'कोरोना'ची चाचणी ?

नागपूर विद्यापीठात होणार 'कोरोना'ची चाचणी ?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आयसीएमआर’च्या पथकाकडून निरीक्षण : सकारात्मक संकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ चाचण्यांमध्ये गती यावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ची चाचणी करणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘आयसीएमआर’च्या पथकाकडून प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. या पथकाने विद्यापीठाच्या तयारीवर समाधान व्यक्त केले.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाने काही दिवसाअगोदर एक प्रस्ताव ‘आयसीएमआर’ला पाठविला होता. ‘कोरोना’ चाचणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये ‘कोरोना’ चाचणी सुविधा केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद होते.
हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘आयसीएमआर’च्या चमूने विद्यापीठाचा ‘फार्मसी’ विभाग, ‘मायक्रोबायोलॉजी’ व ‘बायोकेमेस्ट्री’ विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे निरीक्षण केले. यानंतर पथकाने एक अहवालदेखील तयार केला. याची एक प्रत प्रभारी कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांनादेखील देण्यात आली आहे.

Web Title: Corona to be tested at Nagpur University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.