निर्दयी झाला कोरोना, आईवडीलांचे छत्र हिरावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:12+5:302021-04-26T04:08:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट काळाच्या रूपाने आले आहे. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या या संकटाने लहानग्या मुलांचे ...

Corona became ruthless, deprived of parents' umbrella! | निर्दयी झाला कोरोना, आईवडीलांचे छत्र हिरावले !

निर्दयी झाला कोरोना, आईवडीलांचे छत्र हिरावले !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट काळाच्या रूपाने आले आहे. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या या संकटाने लहानग्या मुलांचे आईबाबाही हिसकावले आहेत. अनेक मुले अनाथ झाली असून काही कुटुंबात तर नातेवाईकांचा आधारही कोरोनाने हिरावला आहे. कुणाची आई गेली, कुणाचे बाब गेले, तर कुणाचे आईबाबा दोघेही गेले. आता लहानपणीच मुलांवर त्यांच्या भावंडांची जबाबदारी आली आहे. जगही न कळलेल्या वयामध्ये या मुलांवर आलेली ही आपत्ती हृदय पिळवटणारी आहे. होय, कोरोना निर्दयी झालायं !

...

घटना १ :

आई आधीच गेली, आता बाबाही..!

महालमधील ११ वर्षिय यश (नाव बदलले आहे) याचे वडील पूर्व नागपुरातील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक होते. काही वर्षापृूर्वी यशच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. आईच्या पश्चात त्याचे वडीलच यश आणि त्याच्या बहिणीची काळजी घ्यायचे. शाळेच्या तयारीपासून तर खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवायचे. कोरोना संकट आल्यापासून वडिलांचा पगार ५० टक्के झाला. यातून ते घरखर्च, कजराचे हप्ते चुकवत होते. याच काळात १० एप्रिलला वडील कोरोना संक्रमित झाले. उपचारासाठी मेयोमध्ये दाखल केले. मात्र १८ एप्रिलला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखेरच्या क्षणी मुले वडीलांना स्पर्शही करू शकली नाही.

...

घटना २ :

वडील वर्षभरापूर्वी अटॅकने, आता आईही गेली कोरोनाने

अजनी परिसरातील १२ वर्षाचा आर्यन आणि १८ वर्षाची नताशा या दोघांचेही छत्र उडाले. त्यांच्या वडिलांचा मृत्यू २०२० मध्ये हार्ट अटॅकने झाला होता. वडिलांच्या नंतर आईने संसाराची जबाबदारी उचलली. आता कुठे वडीलांच्या वियोगाच्या दु:खातून ही मुले बाहेर पडत होती. पण दुर्दैवाचा फेरा आडवा आला. १८ मार्चला नताशा संक्रमित झाली. उपचारानंतर ती दुरूस्त झाली. मात्र १९ मार्चला आईसुद्धा संक्रमित झाली. श्वास घेणे कठिण होत चालले. उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र काळाने पिच्छा सोडला नाही. २० मार्चला उपचारादरम्यान आईचे निधन झाले. या मुलांवर कोसळलेली आपत्ती शब्दात कशी मांडावी ?

...

आर्थिक अडचणीपायी सारेच कोलमडले

शहरातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणीचे मोठे संकट आहे. या संकटात तर अनेकजण पार कोलमडून गेले आहेत. घरांची खरेदी, बांधकाम यासाठी अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. कोरोनामुळे कामकाज बंद आहे. खाजगी संस्थेत काम करणाऱ्या पगारदारांचे पगारही अर्ध्यावर आले आहेत. दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचे तर पगारच बंद आहेत. कसेबसे घर चालवत असताना कोरोना दारावर थाप देत आहे. उपचारासाठी जवळचा पैसा गमावलेले तर आता पार कोलमडून गेले आहेत.

...

अनाथ मुलांना नातलगांचा आधार

आपले आईवडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ आता जवळचे नातेवाईक करत आहेत. डोळ्यात अविरत पाऊस घेऊन जगणाऱ्या या लहान मुलांचे अश्रु कसे पुसावे, कसे समजवावे, असा प्रश्न या नातेवाईकांसमोर आहे. आईबाबा गेले. आता आजी-आजोबा, काका, मावशी, मोठेवडील, आत्या हे नातेसंबंध छत्र बनून मुलांच्या संगोपनासाठी सरसावले आहेत. ही अनाथ मुले त्यांच्याकडे राहायला गेली असली तरी, आईवडिलांच्या प्रेमाची उब त्यांना कशी मिळणार ?

...

Web Title: Corona became ruthless, deprived of parents' umbrella!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.