उपराजधानीत पुन्हा कोरोना ब्लास्ट! ६१ पॉझिटिव्ह; एकूण ८४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:08 PM2020-06-10T12:08:48+5:302020-06-10T12:09:14+5:30
शहरात बऱ्याच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसू लागली आहे. मास्क न लावता व गरज नसताना नागरिक बाहेर पडू लागले आहेत. याचाच परिणाम स्वरुप कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरात बुधवारी सकाळी ६१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांची संख्या ८४० वर पोहचली आहे.
लॉकडाऊन संपत जाण्याच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागांमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित सापडले नव्हते त्या भागातही ते सापडू लागले आहेत. मार्टिननगर, शिवाजीनगरसारख्या वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
नागरिक आपल्या सामान्य आयुष्याकडे वळत असताना, कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही प्रशासन व आरोग्यसेवेसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.
नागपुरात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
शहरात बऱ्याच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसू लागली आहे. मास्क न लावता व गरज नसताना नागरिक बाहेर पडू लागले आहेत. याचाच परिणाम स्वरुप कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे .