कोरोना रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:09 AM2021-03-17T04:09:37+5:302021-03-17T04:09:37+5:30

नागपूर : कोरोनाच्या दुसरी लाट अधिक धाकधूक वाढविणारी आहे. कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येने १३ सप्टेंबर रोजीच्या २३४३ रुग्णसंख्येचा जुना विक्रम ...

Corona breaks old patient record | कोरोना रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडीत

कोरोना रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडीत

Next

नागपूर : कोरोनाच्या दुसरी लाट अधिक धाकधूक वाढविणारी आहे. कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येने १३ सप्टेंबर रोजीच्या २३४३ रुग्णसंख्येचा जुना विक्रम मंगळवारी मोडीत काढला. तब्बल २५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातच पाच महिन्यांतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १८ झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने विशेषत: शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,७५,३८६, तर मृतांची संख्या ४,४८९ वर पोहचली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावाला मार्च महिन्यापासून सुरुवात झाली. सप्टेंबर २०२०मध्ये कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०पर्यंत आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. २४ फेब्रुवारीपासून ते १२ मार्चपर्यंत सलग १७ दिवस बाधितांची संख्या हजारांवर गेली होती, तर, १३ ते १६ मार्च दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर पोहोचली. सध्या रुग्णवाढीचा दर १.४७ टक्के आहे. मृत्युदर ०.४० टक्के आहे. शहरात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असलीतरी पुढील काही दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे.

- शहरात १९२१, तर ग्रामीणमध्ये ६६४ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी १३,३६४ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून शहरातील १,९२१, तर ग्रामीणमधील ६६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील १२, ग्रामीणमधील चार, तर जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,४०,१७१ व मृत्यूची संख्या २,८८६ झाली. ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या ३४२३१ झाली असून, ८०१ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.

-१८,९८० कोरोनाचे सक्रिय रुग्ण

कोरोनाचा या बारा महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या १८,९८० झाली आहे. यात शहरातील १५,५०९, तर ग्रामीणभागातील ३,४७१ रुग्ण आहेत. होमआयसोलेशनमध्ये १३,८६२ रुग्ण आहेत. शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये ५११८ रुग्ण उपचाराखाली आहेत. मंगळवारी १०९५ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दरातही घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त रुग्णांचा दर ९४ टक्के होता मंगळवारी तो ८६.६२ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत १,५१,९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

-पाच दिवसांत ११,३५४ नवे रुग्ण व ६४ मृत्यूची भर

सप्टेंबर महिन्यात दहा हजार रुग्ण गाठण्यास साधारण ८ ते १० दिवस लागायचे. परंतु मागील पाच दिवसांतच १० हजारांचा टप्पा ओलांडण्यात आला. ११,३५४ रुग्ण, तर, ६४ मृत्यूची भर पडली.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १३,३६४

ए. बाधित रुग्ण :१,७५,३८६

सक्रिय रुग्ण : १८,९८०

बरे झालेले रुग्ण : १,५१,९१७

ए. मृत्यू : ४४८९

Web Title: Corona breaks old patient record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.