कोरोनामुळे एक विदेशी, तर तीन घरगुती उड्डाणे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 09:02 PM2020-03-18T21:02:02+5:302020-03-18T21:04:00+5:30
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे. गो एअरचे मंगळवारी दिल्ली-नागपूर उड्डाण रद्द झाले होते.
इंडिगो एअरलाईन्सने दिल्ली-नागपूरची दोन उड्डाणे दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६ ई ७७४ आणि ६३६ दिल्ली-नागपूर-दिल्ली विमान १८ आणि १९ मार्चला रद्द केले आहे. मंगळवारी सायंकाळी उड्डाण रद्द करण्याचे कारण ऑपरेशनल सांगितले आहे. पण गो एअर विमान कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे कारण विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय विमानांच्या कमी संख्येमुळे कंपन्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कोणताही प्रवासी विमानतळावर होणाऱ्या थर्मल स्कॅनिंग तपासणीतून जाण्यास तयार नाही. त्यामुळे ते प्रवास करण्यास भीती बाळगत आहे. शिवाय प्रवासासाठी नकार देत आहेत. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या विमानसेवेवर झाला आहे. नागपुरात सर्वच विमानांमध्ये प्रवासी संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. हीच स्थिती जास्त काळ राहिल्यास अन्य उड्डाणेसुद्धा रद्द करण्याची वेळ कंपन्यांना येणार आहे. मध्य रेल्वेने २८ रेल्वे रद्द केल्या आहेत. अशावेळी प्रवास आवश्यक असतानाही अनेक प्रवासी प्रवासाच्या पर्यायांचा भार झेलण्यास विवश होत आहेत.