कोरोनाचा रुग्णसंख्येतील घट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:40+5:302021-06-01T04:07:40+5:30
नागपूर : सलग ३१ दिवसांपासून सुरू असलेली रुग्णसंख्येतील घट सोमवारीही कायम होती. १२ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सोमवारी रुग्णसंख्या ३१९वर पोहचली ...
नागपूर : सलग ३१ दिवसांपासून सुरू असलेली रुग्णसंख्येतील घट सोमवारीही कायम होती. १२ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सोमवारी रुग्णसंख्या ३१९वर पोहचली तर ११ मार्चनंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा १०वर आला. शहरात १९० रुग्ण व ६ मृत्यू तर ग्रामीण भागात १२६ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. मात्र, मागील तीन महिन्यातील चाचण्यांच्या तुलनेत आज सर्वात कमी, ७६५३ चाचण्या झाल्या.
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी ६,२६१ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. यातील ४,१४६ रुग्ण होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगीकरणात आहेत. यांच्यावर नजर न ठेवल्यास त्यांच्याकडून इतरांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मंगळवारपासून निर्बंध काहीसे शिथिल होत असले तरी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी शहरात ६,७७८ तर ग्रामीणमध्ये ८७५ चाचण्या झाल्या. शहरात पॉझिटिव्हिटीचा दर २.८० टक्के तर ग्रामीणमध्ये हाच दर १४.४ टक्के होता. आज ८२९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४,५९,४४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ७,६५३
शहर : १९० रुग्ण व ६ मृत्यू
ग्रामीण : १२६ रुग्ण व १
एकूण बाधित रुग्ण :४,७४,६०५
एकूण सक्रिय रुग्ण : ६२९१
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,५९,४४२
एकूण मृत्यू : ८,९०२