कोरोना मृत्यूचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:06+5:302021-04-02T04:08:06+5:30

नागपूर : कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्युदराने नागपूर जिल्ह्यात टेन्शन वाढवले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० च्या खाली असलेली मृत्युसंख्या ...

Corona death blast | कोरोना मृत्यूचा स्फोट

कोरोना मृत्यूचा स्फोट

Next

नागपूर : कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्युदराने नागपूर जिल्ह्यात टेन्शन वाढवले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० च्या खाली असलेली मृत्युसंख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ५० वर गेली, आता थेट ६० झाली. मृत्युदर २.२४ टक्क्यांवर गेली. शिवाय, मागील दोन दिवस तीन हजारांखाली असलेली रुग्णसंख्या गुरुवारी पुन्हा ३६३० झाली. रुग्णांची एकूण संख्या २,२९,६६८ तर, मृतांची संख्या ५१५८ नोंदविण्यात आली. वाढत्या गंभीर रुग्णसंख्येने शहरात खाटांची संख्या कमी पडताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या वर्षभराच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यूंची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली. एकाच दिवशी ६४ रुग्णांचे जीव गेले. त्यानंतर मृत्यूचा आकडा कमीकमी होत गेला. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा मृत्यूची संख्या वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दैनंदिन मृत्यूची संख्या ५ ते १२ च्या दरम्यान होती. मागील सहा दिवसांपासून दररोज ५० वर मृत्यू होत आहे. यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी चाचण्यांच्या संख्येने उच्चांक गाठला. १३,९३० आरटीपीसीआर, ३९४८ रॅपिड ॲण्टिजेन मिळून १७,८७६ चाचण्या झाल्या.

-शहरात ३५ तर, ग्रामीणमध्ये २१ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात एकूण रुग्ण व मृत्यूमध्ये शहरातील ३५ मृत्यू व २४८१ रुग्ण आहेत. तर, ग्रामीणमध्ये २१ मृत्यू व ११४५ रुग्ण आहेत. मागील आठवड्यापासून ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीणमध्ये ऑक्सिजन खाटा कमी पडत असल्याने अनेक गंभीर रुग्णांना नागपुरात पाठविले जात आहे. परिणामी, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

-३१ हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

नागपूर जिल्ह्यात ३९,९७३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३१,११४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याने रुग्ण गंभीर होत आहेत. परिणामी, खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत ८,८५९ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

-मागील सहा दिवसांतील मृत्युसंख्या

२७ मार्च : ५४

२८ मार्च : ५८

२९ मार्च : ५५

३० मार्च : ५४

३१ मार्च : ५८

१ एप्रिल : ६०

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या : १७,८७६

ए. बाधित रुग्ण :२,२९,६६८

सक्रिय रुग्ण : ३९,९७३

बरे झालेले रुग्ण : १,८४,५३७

ए. मृत्यू : ५१५८

Web Title: Corona death blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.