कोरोनाने ७९५ महिलांचे कुंकू हिरावले, तर १७५० बालके अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:09 AM2021-08-13T04:09:19+5:302021-08-13T04:09:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट हे महायुद्धासारखे असून, त्याचे दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. ...

Corona deprived 795 women of kumkum, while 1750 children were orphaned | कोरोनाने ७९५ महिलांचे कुंकू हिरावले, तर १७५० बालके अनाथ

कोरोनाने ७९५ महिलांचे कुंकू हिरावले, तर १७५० बालके अनाथ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट हे महायुद्धासारखे असून, त्याचे दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. या माहामारीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ७९५ महिलांचे कुंकू हिरावले, तर १७५० बालकांचे मातृपितृ छत्र हरवले आहे. कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांना मदत करण्यासाठी जिल्हा टास्क फोर्स अतंर्गत उपसमिती गठित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात कोरोनाकाळातील विविध विभागाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जैस्वाल, आमदार मनीषा कांयदे, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलीस उपायुक्त संजय आव्हाड उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. एक पालक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण, शिक्षण, त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे गरेजेचे आहे. जी बालके अनाथ झाली आहेत व जेथे मुलींचे वय १० वर्षांच्यावर व १८ वर्षांखाली आहे. तेथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कुटुंबाकडे प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष द्यावे. तसेच ही बालके बालमजूर म्हणून कुठेही काम करताना आढळू नये, यासाठी अशा कुटुंबांचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही उपसभापती गोऱ्हे यांनी महिला व बालविकास तसेच पोलीस विभागाला दिले.

कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबातील विधवा स्त्रिया, बालके आदींची शहरी, ग्रामीण, ग्रामीण, शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब अशी वर्गवारी करावी. जेणेकरून शेतीच्या टप्प्यावर त्यांना काही गरज आहे का, याची माहिती घेऊन अशा कुटुंबांना मदत करता येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात चांगले काम झाले असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल हे सकारात्मक व आश्वासक चित्र असल्याचे त्या म्हणाल्या.

- बॉक्स

अशा सूचनाही केल्या

- कोरोनाच्या आर्थिक अरिष्टातून सावरण्यासाठी व विकासप्रक्रियेत सामावण्यासाठी सर्व मदत योजना नियमितपणे राबवा.

- या सर्वांचा अहवाल १२ सप्टेंबरपर्यंत सादर करा.

- बांधकाम कामगार मंडळाने १७ व १८ ऑगस्टला तर २३ व २४ ऑगस्टला घरेलू कामगारांचा मेळावा घ्या.

- खनिज विकास निधीचा उपयोग या सर्व घटकांच्या मदतीसाठी करावा.

- कोरोनामुक्त गावामध्ये जाऊन अँटिबॉडीज टेस्ट कराव्यात.

- लसीकरणाची गती वाढवावी.

- कामगार नोंदणीला गती द्यावी.

- संजय गांधी निराधार योजनांचा लाभ द्यावा.

- बॉक्स

-कोरोनामुक्तीचा पॅटर्न, ६३ गावे काेरोनामुक्त.

नागपूर जिल्ह्यातील ६३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यावेळी कोरोनामुक्त गावांची यशकथा व सादरीकरण करण्यात आले. खुर्सापारचे संरपच सुधीर गोतमारे, कढोलीच्या संरपच प्रांजल वाघ, पिपळधरा गटग्रामपंचायतीच्या संरपच नलिनी शेरकुरे यांनी यावेळी गावाच्या कोरोनामुक्तीचा प्रवास सांगितला.

Web Title: Corona deprived 795 women of kumkum, while 1750 children were orphaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.