कोरोनाने मृत ११४ शेतकऱ्यांच्या वारसांना बियाणे व खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:17+5:302021-06-26T04:08:17+5:30

सावनेर : कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या सभागृहात मका व कापूस ...

Corona distributes seeds and fertilizer to heirs of 114 deceased farmers | कोरोनाने मृत ११४ शेतकऱ्यांच्या वारसांना बियाणे व खत वाटप

कोरोनाने मृत ११४ शेतकऱ्यांच्या वारसांना बियाणे व खत वाटप

Next

सावनेर : कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या सभागृहात मका व कापूस पिकावरील आयोजित एकात्मिक पीक व कीड व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. तीत कोरोनामुळे मृत पावलेल्या ११४ शेतकऱ्यांच्या वारसांना कापूस व तूर बियाणे आणि विविध खतांचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, जि.प. कृषी सभापती तपेश्वर वैद्य, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पं.स. सभापती अरुण शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. जीवन कतोरे, डॉ. राहुल कडस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंत चौधरी, उपसभापती चंद्रशेखर कुंभलकर, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष दिलीप बनसिंगे, पेमचंद सावजी, तालुका कृषी अधिकारी आश्विनी कोरे, बाजार समितीचे सचिव अरविंद दाते आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांना मका पिकावरील एकात्मिक पीक व त्यावरील कीड यांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Corona distributes seeds and fertilizer to heirs of 114 deceased farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.