एक महिन्यानंतर कोरोनाचा दुहेरी आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:59+5:302021-09-06T04:10:59+5:30

नागपूर : कोरोनाचा संसर्ग चार महिन्यांपासून कमी होत असताना मागील दोन दिवसांपासून तो वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ...

Corona double digits a month later | एक महिन्यानंतर कोरोनाचा दुहेरी आकडा

एक महिन्यानंतर कोरोनाचा दुहेरी आकडा

Next

नागपूर : कोरोनाचा संसर्ग चार महिन्यांपासून कमी होत असताना मागील दोन दिवसांपासून तो वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एक महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचा दुहेरी आकडा पुढे आला. रविवारी १० रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण शहरातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०६० तर मृतांची संख्या ५ दिवसांपासून १०,११९ वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी शहरात ६, ग्रामीणमध्ये ५, तर जिल्हाबाहेर १ असे एकूण १२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकदाही दुहेरी आकडा गाठला नव्हता. महिन्याभरानंतर आज दुेहरी आकड्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मागील २४ तासांत ४,४०२ चाचण्या झाल्या. यात शहरातील ३,५३१, तर ग्रामीणमधील ८७१ चाचण्या होत्या. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा दर ०,२२ टक्के, तर शहरात ०.२८ टक्के आहे. तीन दिवसांपासून ग्रामीणमध्ये एकाही रुग्णाची नोंद किंवा मृत्यू नाही. मात्र शहरात रुग्ण वाढत आहेत. ३ सप्टेंबर रोजी १, ४ सप्टेंबर रोजी ७, तर आज दहा रुग्ण आढळून आले.

४७ सक्रिय रुग्णांमधील दहा आमदार निवासात

कोरोनाचा ४७ सक्रिय रुग्णांमध्ये दहा रुग्ण आमदार निवासात आहे, तर उर्वरित ३७ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. यात मेडिकलमध्ये १३, मेयोमध्ये ४, तर एम्समध्ये ६ रुग्ण आहेत.

दोन डॉक्टर पॉझिटिव्ह

खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या एका ‘वॉटसॲप’ ग्रुपवर एका वरिष्ठ डॉक्टरने दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ‘व्हायरल’ केली. हे दोन्ही डॉक्टर खासगी हॉस्पिटलमधील आहे. यांना ‘ओपीडी’ म्हणजे बाह्यरुग्ण विभागातून लागण झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे रुग्ण तपासताना डॉक्टरांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

कोरोनाची रविवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ४४०२

शहर : १० रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९३,०६०

एकूण सक्रिय रुग्ण : ४७

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,८९४

एकूण मृत्यू : १०,११९

Web Title: Corona double digits a month later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.