कोरोना इफेक्ट; नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 08:55 PM2021-12-22T20:55:19+5:302021-12-22T20:57:44+5:30

काेराेना काळात लग्नात उधळपट्टी करण्याबाबतची मानसिकता बदलायला सुरुवात झाली. उधळपट्टी करण्याऐवजी साधेपणाने नाेंदणी विवाह करण्याकडे लाेकांचा कल वाढला आहे.

Corona effect; The number of registered marriages increased | कोरोना इफेक्ट; नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली

कोरोना इफेक्ट; नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली

Next
ठळक मुद्देयंदा ३,२५० जणांनी केले कोर्ट मॅरेजदररोज किमान २५ ते ३० जणांचा नोंदणी विवाह

नागपूर : लग्न समारंभ धुमधडाक्यात साजरा करणे, ही बहुतेक कुटुंबाची इच्छा असते. मात्र काेराेना महामारीच्या काळात या गाेष्टींवर विरजण पडले हाेते. तसा काेराेना महामारीचा काळ हा या पिढीच्या सर्वात वाईट आठवणींपैकीच एक हाेय. मात्र अनेक गाेष्टी शिकवून गेला. लग्नात उधळपट्टी करण्याबाबतचीही मानसिकता यातून बदलायला लागली आहे. उधळपट्टी करण्याऐवजी साधेपणाने नाेंदणी विवाह करण्याकडे लाेकांचा कल वाढला आहे. विशेषत: आर्थिक स्थिती बिघडलेल्यांसाठी तर नाेंदणी विवाह हा साेयीचा भाग झाला आहे. जिल्ह्यातील नाेंदणी कार्यालयात वाढलेल्या लग्नकार्याने ही बाब अधाेरेखित हाेत आहे. पूर्वी दरराेज मुश्किलीने १० ते १५ वर जाणारा लग्नाचा आकडा आता २५ ते ३० वर गेला आहे, हे विशेष.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहदुय्यम निबंधक क्रमांक १ व विवाह अधिकारी यांचे संगणकीकृत कार्यालयातील आकडेवारीनुसार कोरोना काळापूर्वी व कोरोनानंतरचा विचार केला तर नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मागील दोन वर्षांचाच विचार केला तर २०२० साली तब्बल ३,१९९ जणांनी नोंदणी विवाह केला. २०२१ मध्ये आतापर्यंत म्हणजेच २० डिसेंबरर्पंत ३,२५० जणांनी नोंदणी विवाह केलेला आहे. यापूर्वी २०१९ चा विचार केला तर २,५०० आणि २०१८ मध्ये २,३५० इतके नोंदणी विवाह झालेले आहेत. सरासरी २५ ते ३० जण दररोज नोंदणी विवाह करतात.

- १० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ४५ विवाह

१० नोव्हेंबर हा दिवस नोंदणी विवाहसाठी महत्त्वाचा ठरला. या दिवशी तब्बल एकाच दिवशी ४५ नोंदणी विवाहाची नोंद करण्यात आली. त्याला कारणही तसेच हाेते, त्यापूर्वी सलग तीन दिवस सुटी होती. त्यामुळे एकाच दिवशी गर्दी वाढली.

- कमी खर्चात झटपट लग्नाची सर्व सुविधा

कमी खर्चाचे लग्न म्हणजे नोंदणी विवाह हाेय. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी विवाह कार्यालयात आलेल्या जोडप्यांसाठी परिसरात झटपट लग्नाची सर्व सुविधाही उपलब्ध असते. नाेंदणी करून बाहेर पडलेल्या जोडप्यांसाठी लग्नाचे फोटो काढणारे असतात. त्यांच्याकडे हारापासून सर्व सुविधा असते. लग्न झाल्याचे छायाचित्रही लगेच मिळते.

- आंतरजातीयसह स्वजातीयांची संख्याही मोठ्या प्रमाणावर

सरासरी नोंदणी विवाह करणाऱ्यांमध्ये आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. परंतु आता यात बदल होताना दिसतो. स्वजातीय जोडपीसुद्धा मोठ्या प्रमाणावर विवाह नोंदणीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Corona effect; The number of registered marriages increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न