कोरोनाचा परिणाम, नागपुरात फटाक्यांच्या दुकानात २२ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:31 PM2020-11-03T22:31:39+5:302020-11-03T22:33:24+5:30

Cracker shops declined, Nagpur news दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीसाठी शहरात दुकाने थाटली जातात. पण यावर्षी कोरोना संसर्गाचा परिणाम फटाक्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता दिसून येत आहे.

Corona effects in 22 per cent drop in cracker shops in Nagpur | कोरोनाचा परिणाम, नागपुरात फटाक्यांच्या दुकानात २२ टक्के घट

कोरोनाचा परिणाम, नागपुरात फटाक्यांच्या दुकानात २२ टक्के घट

googlenewsNext
ठळक मुद्दे नऊ अग्निशमन केंद्रांतून ५८२ दुकानांना मंजुरी : लोक जागरूक

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीसाठी शहरात दुकाने थाटली जातात. पण यावर्षी कोरोना संसर्गाचा परिणाम फटाक्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता दिसून येत आहे. नागपूरकर पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूक झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी २२.६१ टक्के कमी अर्ज आले आहेत.

२ नोव्हेंबरपर्यंत अग्निशमन विभागाच्या नऊ फायर स्टेशनमध्ये ५८२ फटाका दुकानांसाठी अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी अग्निशमन विभागाने एकूण ७५२ दुकानांना मंजुरी दिली होती. यावर्षी सक्करदरा फायर स्टेशनने सर्वाधिक ११४ फटाका दुकानांना मंजुरी दिली आहे. तर गंजीपेठ फायर स्टेशनने सर्वात कमी ३५ दुकानांना मंजुरी दिली आहे. त्रिमूर्तीनगर फायर स्टेशनची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. गेल्यावर्षी या स्टेशनने १११ दुकानांना मंजुरी दिली होती, पण यावर्षी ८४ दुकानांना परवानगी दिली आहे. सिव्हिल लाईन्स फायर स्टेशन अंतर्गत गेल्यावर्षीच्या १०६ दुकानांच्या तुलनेत यंदा ६७ दुकाने लागतील.

पर्यावरणाप्रति जागरूकता वाढली

मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके म्हणाले, पर्यावरणाप्रति लोकांमध्ये जागरूकता वाढल्याने दिवाळीत फटाक्यांकडे ओढा कमी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे दुकानांची संख्या कमी झाली आहे. दिवाळी आनंदाचा सण आहे. फटाके उडविताना लोकांनी सुरक्षा पाळावी. मुलांना एकटे सोडू नये. घातक फटाक्यांपासून दूर राहावे.

अग्निशमन केंद्र २०१८ २०१९ २०२०

सिव्हील लाईन्स १३७ १०६ ६७

गंजीपेठ ४७ ४४ ३५

सक्करदरा १५३ १३६ ११४

कळमना ४९ ५९ ३८

सुगतनगर ११० १२० ९३

लकडगंज ५७ ५२ ४५

नरेंद्रनगर १८५ ८१ ६९

कॉटन मार्केट ३९ ५२ ३७

त्रिमूर्तीनगर ०० ११२ ८४

एकूण ७७७ ७५२ ५८२

(फटाके दुकानांसाठी २ नोव्हेंबरपर्यंत अग्निशमन विभागाकडे आलेले अर्ज.)

Web Title: Corona effects in 22 per cent drop in cracker shops in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.