कोरोना महामारीमुळे घटले जन्माचे प्रमाण : भीतीपायी लांबवला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 09:40 PM2021-05-20T21:40:05+5:302021-05-20T21:41:09+5:30

Corona epidemic reduces birth rates कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजाराने सर्वच क्षेत्रांवर परिणाम केला आहे. नैसर्गिक जन्म-मृत्यूच्या प्रक्रियेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महामारीने एकीकडे माणसांच्या मृत्यूचे आकडे फुगविले आहेत; पण त्याच वेळी जन्मदरामध्ये मात्र कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

Corona epidemic reduces birth rates | कोरोना महामारीमुळे घटले जन्माचे प्रमाण : भीतीपायी लांबवला पाळणा

कोरोना महामारीमुळे घटले जन्माचे प्रमाण : भीतीपायी लांबवला पाळणा

Next
ठळक मुद्देमृत्यूचा आकडा मात्र फुगला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजाराने सर्वच क्षेत्रांवर परिणाम केला आहे. नैसर्गिक जन्म-मृत्यूच्या प्रक्रियेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महामारीने एकीकडे माणसांच्या मृत्यूचे आकडे फुगविले आहेत; पण त्याच वेळी जन्मदरामध्ये मात्र कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहराच्या आकडेवारीवरूनही हा प्रभाव दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ९००० च्या वर बाळांचे जन्म कमी झाले तर २०२१ मध्ये हा आकडा आणखी खाली आल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप कायम आहे. पहिली लाट संपत नाही तोच या वर्षी फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडाही वाढला. निव्वळ कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा या वर्षी ५००० च्या वर गेला. विशेष म्हणजे हा आकडा केवळ साडेचार महिन्यांचा म्हणजे २० मे २०२१ पर्यंतचा आहे. २०२० च्या मार्चपासून ते डिसेंबरपर्यंतच्या आकड्यांपेक्षाही तो अधिक आहे. २०१९ मध्ये सर्वसाधारण १८ हजारांच्या जवळपास मृत्यूंची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये हा आकडा २२ हजारांवर पोहोचला. यामध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे. मात्र या वर्षी चारच महिन्यांत सर्वसाधारण व कोरोना मिळून मृत्यूंचा आकडा १२ हजारांच्या वर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत जन्माचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये ५३,९०७ मुलांचा जन्म झाला होता. २०२० मध्ये त्यात ९,०७१ ची घट झाल्याचे दिसून येते. या वर्षी ४४,९७८ बालकांचा जन्म झाला. यामध्ये २३,२२८ मुले व २१,७५० मुलींचा समावेश आहे. २०१९ च्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९५१ वरून ९३६ वर घसरल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये जन्म प्रमाणात आणखी म्हणजे ३५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल २०२० मध्ये ३,२०७ जन्माच्या तुलनेत २०२१ च्या एप्रिल महिन्यात २,१५१ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते जन्मदर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत व ती कोरोनाशी संबंधित आहेत. एकतर गेल्या दीड वर्षात लग्नांचे प्रमाण कमालीचे घटले. ५० टक्केंच्या वर लग्न रद्द करण्यात आली किंवा पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनीही संसर्गाच्या भीतीपायी पाळणा लांबविला. रुग्णालयातील भीषण परिस्थितीत गैरसोयीचा विचार करता प्रेग्नेंसी टाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

लग्नाची संख्याही घटली

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून लग्नांची संख्याही घटली आहे. मार्च २०२० आलेल्या काेराेनाच्या पहिल्या लाटेनंतर जूनपर्यंत सर्व कारभार ठप्प राहिले. त्यानंतर काहीसी शिथिलता आली व रखडलेल्यांनी लग्न उरकून घेतले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा लग्न समारंभ खाेळंबले. सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात जवळपास ५००० लग्न झाल्याची नाेंद आहे. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच म्हणावा लागेल.

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ -५३९०७ -१८४३१

२०२० -४४९७८ -२२७४३

२०२१ -००    -      ००

Web Title: Corona epidemic reduces birth rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.