काटोलमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:03+5:302020-12-17T04:37:03+5:30
काटोल/कळमेश्वर/हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. काटोल तालुक्यात बुधवारी १३६ नागरिकांच्या चाचण्या ...
काटोल/कळमेश्वर/हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. काटोल तालुक्यात बुधवारी १३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील द्वारकानगरी येथील ६, आयु.डी.पी (३), पंचवटी (२) तर धंतोली, जानकी नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागात कोंढाळी, सोनोली आणि पारडसिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात बुधवारी सहा रुग्णांची भर पडली. यात वानाडोंगरी येथे ३, डिगडोह (२) व इसासनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात सध्या बाधितांची संख्या ३७१८ झाली असून यातील ३३५१ रुग्ण बरे झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कळमेश्वर तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ४ तर ग्रामीण भागातील वाढोणा, तिष्टी आणि पिपळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.