कोरोनाचा रुग्णसंख्येत चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:46+5:302021-09-10T04:12:46+5:30

नागपूर : कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येत महिन्याभरानंतर दुहेरी आकडा सलग तिन दिवस दिसून येताच खळबळ उडाली. मात्र, चौथ्याच दिवशी रुग्णसंख्या ...

Corona fluctuations in patient numbers | कोरोनाचा रुग्णसंख्येत चढउतार

कोरोनाचा रुग्णसंख्येत चढउतार

Next

नागपूर : कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येत महिन्याभरानंतर दुहेरी आकडा सलग तिन दिवस दिसून येताच खळबळ उडाली. मात्र, चौथ्याच दिवशी रुग्णसंख्या निम्म्यावर आली. रुग्णसंख्येचा हा चढ-उतार जुलै महिन्यांपासून सुरू आहे. गुरुवारी ७ रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,१०३ तर मृतांची संख्या १०,११९ वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ४४४४ चाचण्या झाल्या. यात शहरात ३२१६ चाचण्यांमधून ४ तर ग्रामीणमध्ये १२२८ चाचण्यांमधून २ रुग्ण आढळून आले. याशिवाय, जिल्ह्यबाहेरील १ रुग्ण आहे. शहरात आतापर्यंत ३,४०,१३३ रुग्ण व ५८९३ मृत्यू तर ग्रामीणमध्ये १,४६,१४४ रुग्ण व २६०३ मृत्यू आहेत. सध्या शहरात ४७, ग्रामीणमधील १६ तर जिल्हाबाहेरील १ असे एकूण कोरोनाचे ६७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यातील ६ रुग्ण ग्रामीण भागात गृहविलगीकरणात तर ६१ रुग्ण शहरातील कोविड केअर सेंटर व विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. आज ६ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८२,९१७ झाली आहे. याचे प्रमाण ९७.९३ टक्के आहे.

:: कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४४४४

शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९३,१०३

ए. सक्रिय रुग्ण :६७

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९१७

ए. मृत्यू : १०११९

Web Title: Corona fluctuations in patient numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.