नागपुरात काेराेना संक्रमित ॲम्ब्युलन्सचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 10:34 PM2021-04-30T22:34:40+5:302021-04-30T22:36:38+5:30
Corona death शहरातील ॲम्ब्युलन्सचेचालक- मालकही काेराेना संक्रमणाचे बळी ठरत आहेत. गुरुवारी रात्री अशाच एका ॲम्ब्युलन्सचालकाचा काेराेना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने ॲम्ब्युलन्सचालक- मालकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना विषाणूपासून बचावाचे साधन व लसीकरणाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण हाेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ॲम्ब्युलन्सचेचालक- मालकही काेराेना संक्रमणाचे बळी ठरत आहेत. गुरुवारी रात्री अशाच एका ॲम्ब्युलन्सचालकाचा काेराेना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने ॲम्ब्युलन्सचालक- मालकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना विषाणूपासून बचावाचे साधन व लसीकरणाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण हाेत आहे.
शहरात ५०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका आहेत आणि त्यांचे १,००० ते १,२०० चालक- मालक आहेत. काेराेना संक्रमितांना रुग्णालयात भरती करण्यापासून घरी आणण्यापर्यंतच्या कामात त्यांची मदत घेतली जाते. असे काम करताना एमआयजी काॅलनी, रामबाग निवासी रुग्णवाहिका चालक-मालक सचिन टाेंडगिरी (४८) संक्रमित झाला. ताे मेडिकल परिसरात रुग्णवाहिका चालविताे. त्याच्यावर हिंगणा येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मात्र, गुरुवारी रात्री सचिनचे निधन झाले. सचिनच्या मृत्यूमुळे रुग्णवाहिकाचालकांमध्ये दहशत पसरली आहे. चालकांनी सांगितले, पीपीई किट न वापरता संक्रमित रुग्णाला हातसुद्धा लावता येत नाही. या किटची किंमत ३०० ते ३५० रुपये आहे. रुग्णवाहिकेत दाेन- तीन कर्मचारी काम करीत असतात. पीपीई किटचा खर्च मागितल्यास रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकाचालकांवर अधिकचे भाडे घेत असल्याचा आराेप करतात. त्यामुळे चालकांना पीपीई किटशिवाय जीव धाेक्यात घालून काम करावे लागते. अशावेळी संक्रमित हाेण्याचा सर्वाधिक धाेका असताे.
बहुतेक रुग्णवाहिका चालक-मालक तरुण वर्गातील आहेत. त्यांनी लसीकरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर ४५ वर्षांची मर्यादा ओलांडल्यानंतर येण्यास सांगण्यात आले. लसीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही चालकांना फ्रंटलाइन वर्कर माणण्यास नकार दिल्याची व्यथा ॲम्ब्युलन्सचालकांनी मांडली. आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याच्या घाेषणेनंतर त्यांच्यात आशा निर्माण झाली हाेती. मात्र, पुन्हा १ मेपासून लसीकरण सुरू हाेणार नसल्याचे समजल्याने निराशा आली आहे. त्यामुळे जीव धाेक्यात घालून काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नसल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.